बुलढाणा (हॅलो बुलडाणा) मी ए एन एम माझ्या भावना आज मला खर व्यक्त करायचे आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियान या आस कार्यक्रमांमध्ये मी गेले पंधरा ते सतरा वर्ष काम करत आहे कधीतरी आमचा विचार करुन शासन समावेश करेल अशी आशा होती शासनाने दिनांक 14 मार्च 2024 रोजी शासन निर्णय काढला त्याप्रमाणे दहा वर्षे सर्विस झालेल्या व 30 टक्के प्रमाणे नियमित सेवेत समावेशन करण्याचे निर्णय घेतला .
खूप आनंद झाला होता, परंतु हे शासनाकडून दाखवलेल गाजर एवढ्यासाठी म्हटलं जाते, गेले सहा महिने जीआर निघाल्यापासून सेवा जेष्ठता याद्या मध्येच शासनाने गुंतवून ठेवलं आता आचारसंहिता लागल्यानंतर शासनाला आम्हाला order देणार म्हणून काही जण सांगत आहें आज तरी काही उपयोग होऊ शकत कारण आचारसंहिता लागलेली आहे गेले चार-पाच वर्षापासून आमच्याकडून समावेशन करण्याच्या नावाखाली रिचार्जे 7५ केले, काही संघटना पदाधिकाऱ्यांनी घेतल्या ज्यावेळी जीआर निघाला त्यावेळी वाटलं आता आमचं समायोजन होणार, मानधन वाढ करतो, कधी सेवा जेष्ठता यादीमध्ये घेतो. आता सरते शेवटी मिळालं काय तर आचारसंहिता लागल्यानंतर सेवा जेष्ठता याद्या प्रसिद्ध करायचं नाटक शासनाकडून सुरू आहे, खरंतर आम्ही समावेशन होणार म्हणून आमच्या सौभाग्याच्या अलंकार सुद्धा गहाण ठेवून संघटनेला पैसे दिले, यांनी कोट्यावधी रुपये गोळा केले आणि स्वतःची घरे भरली आज हे आमच्या पैशातून स्वतःच्या घराची दिवाळी साजरी करतील, आम्ही कर्ज काढली लोकांच्याकडून भिका मागून पैसे गोळा केले आणि ते संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले एवढ्यावर ही संघटनेच्या भागलं नाही. आम्हाला आचारसंहितेपूर्वी ऑर्डर देणं गरजेचं होतं हेही तुम्ही केलं नाही आज आमची लेकरं, बाळ दिवाळीच्या तोंडावर कपड्यासाठी इतर गोष्टीसाठी पैसे मागत आहेत, कुठून पैसे द्यायचे ना मला तुम्ही परमनंट च्या ऑर्डर दिल्या ना कुठले आदेश मिळाले मग हे पैसे घेतले कशासाठी आमची फसवणूक कशासाठी केली गेली* आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे ए एन एम ची पदे सार्वजनिक आरोग्य विभाग भरतच नाही, मग आम्हाला काय फक्त गाजरच दाखवलं का ?
समावेशन होणारच नाही. आज दिपवाळीच्या तोंडावर आमच्या लेकरा बाळांनी कुणाकडे बघावं, आम्हाला कळून चुकले आमचे समायोजन होऊ शकत नाही आमची फसवणूक बंद करा. तुमच्याप्रमाणेच आमच्या घरातली दिवाळी गोड होण्यासाठी आमचे घेतलेले पैसे माघारी द्या अन्यथा तुमचीही दिवाळी आम्ही गोड होऊ देणार नाही ज्या ज्या लोकांनी पैसे गोळा केले त्या सर्वांनी आमचे पैसे आम्हाला माघारी परत करावे आमच्या घरामध्ये म्हातारी कोतारी लोक आज औषधं उपचारासाठी वाट पाहत आहेत,त्या पैशांची आम्हाला गरज आहे तुम्हाला पैसे दिल्यामुळे आमच्या घरामध्ये आता नवरा बायको मध्ये भांडण व्हायला लागलेत तुम्ही सर्वांनी आमची फसवणूक केली सर्वांना हात जोडून विनंती आहे, आमच्या लेकरा बाळांचे शाप तुम्ही घेऊ नका जर तुम्हाला माहित होतं आमच्या समायोजन होणार नाही आमच्या भावनांशी खेळ का केला, अहो खरंच आमच्या घरात दिवाळीचा दिवा नाही पेटू शकत, आता रात्र रात्र झोप लागत नाही, पैसे ही गेले आणि ऑर्डर ही नाही, अहो आम्ही तुम्हाला फुल घातली, हार चढवले, का आमच्या भावनांशी खेळला, कोणी अधिकार दिला तुम्हाला, पाया पडते, आमचं मानसिक संतुलन बिघडलं आहें, कृपया आमचे आम्हाला पैसे माघारी द्या. ” एका अभागी बहीण ( ANM) च्या भावना व आर्त किंकाळी.””