spot_img
spot_img

💥 स्फोटक आरोप ! मुस्लिम, मागासवर्गीय व महाविकास आघाडीसंबंधित मतदारांची नावे भाजपाने वगळली ! -भाजपा उपमुख्यमंत्री फडणवीस व पीए महाले यांचा दबाव?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) चिखली विधानसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या आमदार श्वेता ताई महाले आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे.परंतु आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने षडयंत्र रचले असून याबाबतची तक्रार जिल्हाधिकारी यांना दिली. या तक्रारीने निवडणूक आयोग देखील चक्रावला आहे.असाच प्रकार जिल्ह्यातील इतर मतदार संघात निघण्याची शक्यता नाकारता येत नाही?

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी असा आरोप केला की,मतदारांना देखील याचा विश्वास होऊ लागलाय. विद्यमान चिखलीचे आमदार श्वेता ताई महाले यांनी त्यांचे पती विद्याधर महाले यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून चिखली विधानसभा मतदारसंघातील यादीतून मुस्लिम, मागासवर्गीय व महाविकास आघाडी संदर्भातील मतदारांची नावे काढण्यासाठी षडयंत्र असल्याचा आरोप होत आहे.
कारण नावे वगळण्यासाठी मोठ्या प्रमाणात
ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. जिल्ह्यातील एकूण प्राप्त अर्जापैकी 80% ही नावे चिखली मतदारसंघातील आहेत.त्यामुळे हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न असल्याचे राहुल बोंद्रे म्हणाले.या प्रकरणावर आक्षेप घेण्याचा कालावधी देखील संपला आहे. भाजपा ने षडयंत्र रचण्याचा हा करेक्ट कार्यक्रम केला.भाजपा उपमुख्यमंत्री यांच्या दबावाखाली हे कारस्थान होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे .दरम्यान राहुल बोंद्रे यांनी जिल्हाधिकारी यांना सदर तक्रार करून चौकशीची मागणी केली असता त्यांनी निवडणूक आयोगांना हे प्रकरण कळविले आहे.पुढे काय होईल यावर ‘हॅलो बुलढाणा’ चे लक्ष लागून आहेच !

(क्रमशा:) 

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!