spot_img
spot_img

💥मोठी बातमी ! रविकांत तूपकरांची शिवसेना तिकीट फिक्स ? -मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची घेतली तूपकरांनी भेट !

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटात अनेक इच्छुक उमेदवारांनी प्रवेश करून शिवबंधन बांधले मात्र आज शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मातोश्रीवर थेट उद्धव ठाकरेंची भेट घेतली असून, तूपकरांची तिकीट फिक्स झाल्याचे बोलले जात आहे.परंतु ही अधिकृत माहिती नाही त्यामुळे चर्चेचे गुऱ्हाळ सुरू झाले आहे.

रविकांत तुपकर यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष लढून तब्बल अडीच लाख मत घेतली होती.त्यामुळे राजकीय वर्तुळात ते चर्चेचा विषय ठरले होते.त्यांची आंदोलनात्मक भूमिका नेहमीच यंत्रणाहादरवणारी ठरते.तुपकरांचे अनेक आंदोलन यशस्वी झाले आहेत.त्यांचा दांडगा जनसंपर्क पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत ते आश्वासक चेहरा म्हणून समोर येतील असे त्यांच्या समर्थकांना वाटते.दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातून ते निवडणूक लढल्यास मताधिक्य घेऊन जिंकू शकतात असा विश्वास व्यक्त होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!