spot_img
spot_img

‘कानून के हाथ लंबे होते है!’ -वेषांतर करून गुंगरा देणाऱ्या मारेकऱ्याला चिखली पोलिसांनी छ.संभाजीनगरात ठोकल्या बेड्या !

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पत्नीच्या खून प्रकरणी मुख्य आरोपी वेषांतर करून पळून जात असताना, छ.संभाजी नगर येथून त्याच्या चिखली पोलिसांनी छ. नगर पोलिसांच्या मदतीने मुसक्या आवळल्या आहे.

30 सप्टेंबर रोजी रात्री 10.00 वाजताच्या सुमारास फिर्यादी केशव भानुदास महाले रा. कव्हळा व त्यांची मावस बहीण मयत सविता समाधान सुरडकर असे त्यांच्या मोटार सायकलने घरी जात असतांना चिखली शहरात अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ आरोपी समाधान धनसिंग सुरडकर वय 59 वर्ष रा. बेराळा याने कोर्टात सुरु असलेला शेतीचा वाद व कौटुंबिक कारणावरुन कारने पत्नी सविता व तिचा मावस भाऊ केशव महाले असे डबलसिट असलेल्या मोटार सायकलला मागुन धडक देऊन गंभिर जखमी केले.अशी फिर्याद केशव भानुदास महाले यांनी दिल्याने चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. 633 / 2024 कलम 109 भारतीय न्याय संहीता प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.दरम्यान तपासचक्र फिरविण्यात आले. सदर गुन्ह्यातील सविता सुरडकर यांचा संभाजी नगर येथे उपचार सुरु असतांना 02 नोव्हेंबर रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने व आरोपींनी कट रचून सदरची घटना केल्याचे तपासात दिसुन आल्याने गुन्ह्यात कलम 103 (1), 61 (2), (अ) भारतीय न्याय सहींता प्रमाणे कलम वाढ करण्यात आली. आरोपी संतोष सुभाष इंगळे वय 32 वर्ष रा. हरीओम नगर चिखली यास अटक करण्यात आले. सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी समाधान धनसिंग सुरडकर हा घटना घडल्यापासुन फरार झाला होता व तो वारंवार त्याचे लोकेशन बदलत असल्याने तो नेमका कोणत्या ठिकाणी आहे. याबाबत कोणतीही माहीती मिळत नव्हती. सदर आरोपीचा शोध सुरु असतांना दिनांक 06.ऑक्टोंबर रोजी सदर आरोपी हा संभाजीनगर शहरात लपुन असल्याची माहिती पोलीसांना मिळाली, सदर माहीती मिळताच ठाणेदार संग्राम पाटील यांनी सदर आरोपीस पकडण्यासाठी सपोनि संजय मातोंडकर, पोलीस अंमलदार अमोल गवई व राहुल पायघन यांचे पथक रवाना केले.सदर पथकाने आरोपी समाधान सुरडकर हा वेषांतर करुन सिडको भागातुन पळून जाण्याच्या तयारीत असतांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन त्यास गुन्ह्यात अटक केली आहे.सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, मा. अपर पोलीस अधीक्षक बि. बी. महामुणी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधिर पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांच्या नेतृत्त्वात सपोनि संजय मातोंडकर, पोउपनि नितीनसिंह चौहाण, पोना अमोल गवई, गजानन काकड, राहुल पायघन, विजय किटे, पंढरीनाथ मिसाळ, रोहीदास पंढरे, सागर कोल्हे, रुपाली उगले यांनी केली आहे. सदर गुन्ह्यातील फरार आरोपी पकडण्यासाठी सायबर पोलीस स्टेशन बुलडाणा येथील रुषीकेश खंडेराव, राजु आडवे यांनी तसेच संभाजीनगर शहरचे मा. सहा. पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख व त्यांच्या पथकाची मोठी मदत झाली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!