बुलढाणा/अमरावती (हॅलो बुलढाणा) विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आज 5 जिल्ह्यांतील 81 मतदान केंद्रांवर उत्साहात आणि निर्भय वातावरणात मतदान पार पडले. विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती नयना गुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण 35,810 मतदारांपैकी 32,616 मतदारांनी म्हणजे 91.08% मतदान केले आहे.
सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. सर्व केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त होता.
▪️जिल्हानिहाय अचूक आकडेवारी!
1.वाशिम – सर्वाधिक: 3,715 पैकी 3,450 मतदान = 92.87% (7 केंद्र)
2. अकोला – दुसरा: 5,942 पैकी 5,474 मतदान = 92.12% (13 केंद्र)
3.यवतमाळ – तिसरा: 6,932 पैकी 6,389 मतदान = 92.17% (18 केंद्र)
4. बुलढाणा: 9,124 पैकी 8,280 मतदान = 90.75% (18 केंद्र)
5.अमरावती – सर्वात कमी: 10,097 पैकी 9,023 मतदान = 89.36% (25 केंद्र)
▪️प्रशासन सतर्क!
निवडणूक निरीक्षक अभय महाजन आणि विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी अमरावती शहरातील केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी अपर आयुक्त संजय जाधव उपस्थित होते. संपूर्ण मतदान प्रक्रियेवर वेब कास्टिंगद्वारे आयुक्त आणि निरीक्षकांचे लक्ष होते. त्या-त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारीही बारकाईने लक्ष ठेवून होते.
मतपेट्या रात्री उशिरापर्यंत स्ट्राँगरूममध्ये जमा केल्या जाणार असून मंगळवार, 27 ऑक्टोबर 2026 रोजी अमरावती येथील लोकशाही भवन येथे मतमोजणी होणार आहे.






Total Users : 3653583