बुलढाणा (हॅलो बुलढाणा) वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्या…मुख्यमंत्र्यांना व घटक पक्षांना अडचणीत आणू नये ! असे मत उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी आज येथे व्यक्त केले.लोकप्रतिनिधी यांनी नुकतेच राहुल गांधी यांची जीभ छाटण्याच्यासाठी 11 लाखांचे बक्षीस जाहीर करण्याचे बेताल वक्तव्य केले होते.दरम्यान मोठा वाद उफाळून आला होता.या पार्श्वभूमीवर ना.पवारांनी आपले मत व्यक्त करून कोणाला दिला इशारा हे बुलडानाकरांना ज्ञात आहेतच
ना.अजित पवार व उप मुख्यमंत्री फडणवीस आज मुख्यमंत्र्यांसोबत बुलढाण्यात लाडकी बहीण कार्यक्रमासह बुलडाणा शहरातील पुतळ्यांच्या लोकार्पण प्रसंगी दाखल झाले आहेत.दरम्यान या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की,प्रत्येकाला आपापली मते मांडण्याचा विचार व मत मांडणीचा. अधिकार आहे.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा अधिकार आपल्याला दिला आहे.कुठल्याही सत्ताधारी, विरोधी व कुठल्याही पक्ष असो वाचाळ वीरांनी शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात मर्यादा पाळाव्या.कुठेही वेळे वाकडे विधान करून मुख्यमंत्र्यांना किंवा घटक पक्षांना अडचणीत आणू नये! राग व्यक्त करण्यासाठी भाषा कशा असल्या पाहिजेत ? याचा दाखला देत अजित पवार म्हणाले की भाषा अशी वापरली पाहिजे की उद्याला कोणी टीका करायला नको.सुसंस्कृत महाराष्ट्र मध्ये हे शोभत नाही.डॉक्टर यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत महाराष्ट्र कसा कसा असायला हवा ? हे चव्हाण यांनी शिकविले आहे.त्यामुळे अशा विचारांचे महायुतीचे सरकार आहे असेही ना.पवार म्हणाले.










