spot_img
spot_img

माँ जिजाऊं सृष्टी लोककलावंतानी गजबजणार ! -२० व २१ सप्टेंबरला निवासी राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा! -लोककलावंतांनी सहभागी होण्याचे राज्य समन्वयक प्रा.गजेंद्र गवई यांचे आवाहन..

बिबि (हॅलो बुलढाणा/भागवत आटोळे) राजाश्रय नसलेल्या व उपेक्षित जीवन कंठत असलेल्या लोककलावंता साठी “लोककलावंत प्रबोधन परिषद, महाराष्ट्र राज्य ” यांचे वतीने मातृतीर्थ सिंदखेड राजा जिजाऊ सृष्टी येथे २० व २१ सप्टेंबर अशी दोन दिवसिय निवासी राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.या कार्यशाळेत लोकलवंतांनी उपस्थित राहावे,असे आवाहन राज्य समन्वयक प्रा. गजेंद्र गवई यांनी केले आहे.

मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील मराठा सेवा संघ स्थापित जिजाऊ सृष्टी येथे २० व २१ सप्टेंबर २०२४ रोजी दोन दिवसीय लोक कलावंत कार्यात्मक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.सदर कार्यशाळेच्या उदघाट्न प्रसंगी दिनांक २० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता केंद्रीय राज्य मंत्री खा. प्रतापराव जाधव, मराठा सेवा संघांचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर, सिंदखेड राजा आमदार तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, मेहकर आमदार तथा राज्य पंचायत राज समिती अध्यक्ष डॉ. संजय रायमूलकर, चिखली आमदार श्वेताताई महाले, बुलडाणा आमदार संजय गायकवाड, स्वाभिमानी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे सह लॉर्ड बुद्धा टीव्ही चे संचालक सचिन मुन,मराठा सेवा संघांचे डॉ. सुभाष कोल्हे, शाहीर गुलाबराव नळनिकर, शाहीर अरविंद घोगरे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. सदर कार्यशाळेत प्रशिक्षित प्रशिक्षक ऍड. विजयराव जाधव, डॉ.अशोक सावंत, प्रा. मिलिंद सावंत, दीपक कसाळे, ऍड. विद्यासागर वानखेडे, ऍड. साहेबराव सिरसाठ, संजय कांबळे यांचे मार्फत सहभागी लोक कलावंताना सत्र निहाय दोन दिवस कार्यात्मक प्रशिक्षण दिले जाणार आहे. सदर कार्यशाळेत लोकसंघठन, संघटना बांधणी, पदाधिकारी भूमिका जबाबदारी,राज्य सांस्कृतिक धोरणात लोककला आंतर्भाव, शासन दरबारी लोककलावंताना मिळणारा न्याय, आंदोलनात्मक भूमिका,भविष्य वेध व नियोजन या बाबत सामूहिक चर्चात्मक सहभागीय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी कलावंताना दि १९ सप्टेंबर २०२४ पर्यंत आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.त्यामुळे संयोजन समितीला महाराष्ट्र राज्यातून येणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांची निवास, भोजन, चहा नाश्ता, प्रशस्तीपत्र, आवश्यक सेवा पूरविने सोईचे होईल.यासाठी सादर कार्यशाळेत लोककलावंतांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संयोजन समिती कार्याध्यक्ष शाहीर डी. आर. इंगळे, राज्यसमन्व्यक तथा कोषाध्यक्ष प्रा.गजेंद्र गवई, महिला कलावंत राज्य प्रमुख सौ सुनीता खरात, लोकजागर चे प्रवीणभाऊ गिते, रामदास कहाळे, विनोदभाऊ ठाकरे,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अनिल तुपकर,माजी प्राचार्य डॉ पंढरीनाथ शेळके, माजी मुख्याध्यापक खुशालराव झोटे, अमर म्हस्के यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!