spot_img
spot_img

रोमिओ ‘विष्णू’ चा घृणास्पद अवतार ! -‘मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणत अल्पवयीन मुलीचा सातत्याने छळ!’

मलकापूर (हॅलो बुलढाणा) रमाई, माँ जिजाऊ, सावित्रीच्या लेकी या काळात सुरक्षित नाहीत. वासनांधांची मानसिकता अत्यंत खालच्या पातळीवर झुकली असून,महिलांच्या अब्रूवर हात घातल्या जातोय. एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीशी जवळीक साधून ‘तुझ्यावर प्रेम करतो’ म्हणत 27 वर्षाच्या एका विष्णूने मुलीचा छळ चालविल्याचा प्रताप केल्याने या आरोपी विरुद्ध मलकापूर पोलिसांनी विविध कलमान्वये गून्हा दाखल केला आहे.

महिलांसह अल्पवयीन मुलींच्या छळ प्रकरणात दिवसागणिक वाढ होत असल्याची सध्या चिंता सतावत आहे. अशात अल्पवयीन मुलीचा छळ करणारी घटना घाटाखालील मलकापूर येथून नव्याने समोर आली आहे. फिर्यादीनुसार, आरोपीचे (मुलीची बदनामी होऊ नये म्हणून आरोपीचे नाव टाळत आहोत) एका घरी जाणे येणे होते.सदर घरामध्ये एक बारावीत शिक्षण घेणारी अल्पवयीन 17 वर्षीय मुलगी आई वडील व भावासह राहते. आरोपीने कुटुंबाशी आणि मुलीशी ओळख साधली.दरम्यान सन 2021 पासून अल्पवयीन मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू ठेवला.गेल्या मार्च महिन्यात मर्जी नसताना मुलीला आरोपीने शेगाव येथे नेऊन जबरदस्तीने हात पकडून मोबाईलने फोटो सेल्फी काढली.एप्रिल 2024 मध्ये आरोपी मुलीला एका ठिकाणी घेऊन गेला व तेथे सुद्धा भेटून त्याने म्हटले की,’मी तुझ्यावर प्रेम करतो,तू मला खूप आवडतेस’ असा विष्णूचा विचित्र अवतार पाहिल्यावर मुलीने ही हकीकत आई-वडिलांसमोर कथन केली. दरम्यान आरोपीला मुलीच्या आई-वडिलांनी समजावून सांगितले परंतु परत आरोपीने गेल्या काही दिवसापासून मुलीला भेटू म्हणत सारखा पाठलाग करून ‘मला तुझ्या सोबत लग्न करायचे आहे असे सांगत छळ चालविला आहे. तसेच मुलीच्या मोबाईलवर आरोपी फोन कॉल व व्हाट्सअप्प मेसेज वारंवार करून त्रास देत आहे.त्यामुळे मलकापूर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध कलम 74,78,बालकांची लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 8,12 बिएनएस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!