spot_img
spot_img

म्हणे..’तू दरवाजा उघडून माझ्या नवऱ्याकडे का पाहिलेस?’ -पति पत्नीने विवाहितेला धक्काबुक्की करून केला विनयभंग!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मनात संशयाची पाल चुकली की, राग अनावर होतो. मग हातातून गुन्हा देखील घडू शकते. बोराखेडी पोलिस ठाण्यांतर्गत अशी एक घटना समोर आली…’तू दरवाजा उघडून माझ्या नवऱ्याकडे का पाहिलेस?’ म्हणून आरोपी
पति-पत्नीने एका विवाहितेला धक्काबुक्की करून विनयभंग केल्याची तक्रार दाखल झाल्याने पति-पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोताळा तालुक्यातील एका गावातील 25 वर्षीय विवाहितेने बोराखेडी पोलिसांना तक्रार दिली की,11 सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजता च्या दरम्यान तालुक्यातील अंत्री येथील हल्ली मलकापूर येथील पंचमुखी नगर मध्ये राहणाऱ्या आरती मुक्ता रामेश्वर मानकर व रामेश्वर पांडुरंग मानकर यांनी फिर्यादीला शिवीगाळ करून रामेश्वर मानकर यांनी विनयभंग केला. ‘तू दरवाजा उघडून माझ्या नवऱ्याकडे कां पाहीलेस?’ असे आरती मानकर यांनी म्हणत फिर्यादीला धक्काबुक्की करीत जीवे मारण्याची धमकी दिली.अशा फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी आरती मुक्ता रामेश्वर मानकर व रामेश्वर पांडुरंग मानकर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!