बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जंगलव्याप्त बुलढाणा तालुक्यात बिबट्याचा वावर वाढला आहे. बिबटे खाद्याच्या शोधात भटकंती करीत असून, शेतकऱ्यांवर हल्ले होण्याच्या घटनेत वाढ होत आहे.एका बिबट्याने झडप घालून शेतकऱ्याचा गळाच पकडला त्यामुळे शेतकरी दगावला आहे.घटना आज 29 ऑगस्ट रोजी तालुक्यातील गिरडा या घाटात दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास घडली आहे.सुनील सुभाष जाधव वय वर्षीय 36 असे बिबट्याने ठार केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
गोंदणखेड शिवारात गिरडा घाटात त्यांची शेती आहे. शेतीचे राखण करण्याकरिता ते शेतात गेले होते. दुपारच्या सुमारास बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या गळ्याला पकडून 40 ते 50 फूट दरीत ओढत घेऊन गेला यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळीत जाऊन शेतकऱ्याला जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारासाठी हलविण्यात आले मात्र त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळतात फॉरेस्ट डिपार्टमेंट चे पथक घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.त्यांच्या पश्चात एक मुलगी पत्नी 2 भाऊ आई-वडील परिवार आहे.












