बुलढाणा (हॅलो बुलढाणा) चिखली रोड वरील राणी बगीच्यातील 3 चंदनाच्या झाडांची कत्तल झाल्याचे समोर आल्याने ही झाडे तोडणारे पुष्पा कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या तीन-चार वर्षात शासकीय निवासस्थानातून,जिल्हा रुग्णालय परिसरातून अनेकदा चंदनाच्या झाडांची कत्तल झालेली आहे.दरम्यान आज उपवन संरक्षक कार्यालय, राणी बगीच्यातील 3 चंदनाची झाडे तोडण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते गणेश सोनुने यांना मिळाली.त्यांनी तात्काळ वन विभागाच्या राणी बगीच्यात या संदर्भात पाहणी केली असता,तीन चंदनाची झाडे तोडलेली दिसून आली.सोनुने यांनी आरोप केला की,वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजीत ठाकरे व वनपाल खान हे चंदनाच्या कत्तलीला जबाबदार आहेत. त्यांनी वृक्षतोड करणाऱ्यांच्या संगनमताने चंदनाची झाडे तोडले असून याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी गणेश सोनुने यांनी केली आहे.










