लोणार (हॅलो बुलढाणा /लखन जाधव) शेतकऱ्यांच्या विविध प्रमुख मागण्यांना घेऊन जीवन घायाळ यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक ०१ ऑगस्ट रोजी काढण्यात आलेला शेतकरी आक्रोश मोर्चा लोणार तहसील कार्यालयावर धडकला.
शेतकरी एकता फाऊंडेशनच्या वतीने तहसील कार्यालय लोणार येथे शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये प्रमुख मागण्या २०२३-२४ चा बाकी असलेला पीकविमा तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात सरसगट जमा करा. शेतकऱ्यांना होणाऱ्या वन्य प्राण्यांचे ताबडतोब बंदोबस्त करावा, मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी रोही नुकसानीचे फॉर्म भरले होते त्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करावी.
येणाऱ्या आठ दिवसाच्या आत जर मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र प्रकारचे आंदोलन करण्यात येईल असा ईशाराही यावेळी देण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व जीवन पाटील घायाळ यांनी केले तर त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून संजीवनी ताई वाघ, श्रीकांत भाऊ मादनकर, गोपाळ भाऊ खोतकर, लालू भाई या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी लोणार तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.












