बुलढाणा (हॅलो बुलढाणा) महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदलीचे विनीयमन आणि शासकीय कर्तव्य पार पडताना होणाऱ्या विलंबासप्रतिबंध अधिनियम 2005 अंतर्गत नायब तहसीलदार, तहसीलदार संवर्गातील अधिकारीयांची प्रशासकीय कारणास्तव पदस्थापना करण्यात आलील आहे.हा अध्यादेश 31 जुलै रोजी निघाला.
अकोट येथील .निवासी नायब तहसीलदार महेंद्र कुमार आत्राम यांची पदस्थापना निवासी तहसीलदार म्हणून अकोला तहसील कार्यालयात करण्यात आली आहे.तसेच शेगाव नायब तहसीलदार एनएस पाठक यांची पदस्थापना बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात सहाय्यक कर करमणूक अधिकारी म्हणून करण्यात आली.तर एस एस व्हट्टे नायक तहसीलदार महसूल माण, दहिवडी जिल्हा सातारा यांची पदस्थापना नांदुरा येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून करण्यात आली आहे.