spot_img
spot_img

एक ढोरचोर पकडला! इनोव्हा गाडी जप्त! -फरार ढोर चोरांच्या मुसक्या कधी आवळणार?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जनावरे चोरीच्या अनेक घटना घडताहेत.दरम्यान बुलढाणा गुन्हे शाखेने 4 गुन्हयाची उकल केली असून, 5,00,000 रुपयां ची इनोव्हा गाडी जप्त केली आहे. केवळ एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी आहे की, विवेक फाळके रा. हिंगणा कोरेगाव तालुका खामगाव यांनी घरासमोर 2 बैल चोरी झाल्याची तक्रार दिली होती. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखाने अकोला येथील एका आरोपीला अटक केली आहे.शेख शखिल शेख जलील रा. जुने शहर अकोला असे आरोपीचे नाव आहे.आरोपी कडून इनोव्हा गाडी(5,00,000)हस्तगत करण्यात आली आहे. खामगाव, तामगाव, जानेफळ,जळगाव जामोद येथील गुन्ह्याचा छडा लावला असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.इतर फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.महत्त्वाचे म्हणजे गिरोली खुर्द येथील श्रीकृष्ण गोसंवर्धन ट्रस्ट मधून देखील 7 गायी व एक गोरा चोरीला गेलेला आहे.याचा शोध लावण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!