बुलढाणा (हॅलो बुलढाणा) कुंभमेळ्यातील मलिदा लाटण्यासाठी हजारो कोटी राखीव ठेवणाऱ्या युती सरकारने लाडक्या बहीण योजनेसाठी चौथ्यांदा सामाजिक न्याय विभागाचा 344 कोटी इतका निधी महिला व बालकल्याण विभागाकडे वळविला आहे. त्यामुळे कोणतीही अर्थनिती नसलेलं हे सरकार पूर्णपणे ‘आर्थिक दिवाळखोर‘ बनल्याची घणाघाती टिका उध्दव ठाकरे गट शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी केली आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या निधीतील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा महिला व बाल विकास विभागाकडे निधी वळवला आहे. सामाजिक न्याय विभागाचे 344 कोटी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी वळवले आहेत, सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी महायुती सरकारने पुन्हा सामाजिक न्याय विभागाच्या निधी वळवला आहे. या योजनेतील लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या तरतुदीतून 344.74 कोटी रुपये महिला व बालकल्याण विभागाकडे वळवण्यात आले आहेत. सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून या योजनेसाठी सातत्याने सामाजिक न्याय विभाग तसेच आदिवासी विकास विभागाचा कोटींचा निधी वळवला जात आहे. त्याचा परिणाम या दोन्ही विभागांच्या इतर योजनांवर जाणवू लागला आहे.
▪️यापूर्वी वळवलेला निधी..!
फेब्रुवारी 2026 – जानेवारीच्या हप्त्यासाठी 98.45 कोटी रुपये, जून 2025 – एप्रिल आणि मे महिन्याच्या हप्त्यासाठी 410 कोटी रुपये
ऑगस्ट- ऑक्टोबर 2025 – जुलै आणि सप्टेंबरच्या हप्त्यांच्या वितरणासाठी प्रत्येकी 410.30 कोटी रुपये
आता चौथ्यांदा सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेकडे वळवण्यात आला आहे.











Total Users : 3343364