लोणार (हॅलो बुलढाणा/शेख समद) जागतिक कीर्तीचे सरोवर असलेल्या लोणार शहरा नविन झालेले रस्ते नाल्यांच्या कामासाठी पुण्यात आल्याने रस्त्याचे तीन तेरा वाजले आहेत.
शहरात गटार नाल्यांच्यां कामा मुळे लोणार शहरात खड्डेच खडे झाले व त्यामुळे शहरात नागरिकांना चालता फिरतांनी मोठी अडचण निर्माण झाली आहे. 26 जुलै रोजी प्रताप चौकात नाल्याचे काम चालू असताना मोटरसायकल वरून एक महिला पडली तसेच आज रोजी प्रताप चौक मध्ये ट्रॅक्टर फसल्यामुळे अचानक समोरून येणाऱ्या मोटरसायकल सोबत दुर्घटना टळली.26 जुलै रोजी लोणार मुख्याधिकारी यांना शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद,व पत्रकार सचिन गोलेच्छा यांनी मुख्याधिकारी व बांधकाम इंजिनियर यांची मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु संबंधित दोन्ही अधिकाऱ्यांनी मोबाईल उचलला नाही गटर नाल्याच्या कामामुळे शहरात घाणीचे साम्राज्य झाले आहे एकीकडे नगर परिषद शहरामध्ये स्वच्छ शहर अशा पाट्या नगरपरिषदेकडून लावलेल्या दिसतात खऱ्या पण जिथे पाट्या तिथंच घाणीचे साम्राज्य,पसरलेला कचरा आणि साचलेले दूषित पाणी यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.










