बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ‘काय झालं? बाळ रडत होतं.. मग ओ.आर.एस. द्या त्याला, असा सल्ला बालरोग तज्ञांनी दिलाय.ओ.आर.एस.
जनजागृती सप्ताह २५ जुलै ते ३१ जुलै हा
कालावधी राबवला जातो. यासाठी जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञांनी पुढाकार घेतला आहे.
या कालावधीमध्ये येणारे गॅस्ट्रो,अतिसार, डायरिया यामुळे बरीच बालके बाधित होतात. मुलांना ओआरएस (जलसंजीवनी) प्यायला दिल्यास जुलाब,उलट्या, अतिसार यामुळे
शरीरातले कमी झालेले पाण्याचे प्रमाण भरून काढण्यासाठी मदत होते आणि मुलांना अतिगंभीर होण्यापासून नक्कीच वाचवता येऊ शकते. व्यवस्थित ओआरएस जर पाजले तर भरती करण्याची गर सुद्धा पडत नाही.
▪️जिल्हा बालरोग तज्ज्ञ संघटना चे अध्यक्ष डॉ.शेवाळे काय म्हणतात?
ओआरएस सांगितल्या प्रमाणे योग्य प्रकारे तयार करावे. थोडी पावडर थोडे पाणी असे न करता प्रमाणातच तयार करावे. बाळ दोन वर्षापेक्षा खाली असेल तर दर एक-दोन मिनिटाला चमचाभर पाणी वाटी चमच्याने त्याला पाजावे. बाळ मोठे असेलतर वारंवार त्याला थोडे थोडे पाणी घोटभर देत राहावे. यामुळे तुमचे बाळ गंभीर होण्यापासून नक्कीच वाचू शकते. याशिवाय कुठल्याही अँटीबायोटिक आणि प्रतिजैवके ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये.
– डॉ. योगेश देविदास शेवाळे,अध्यक्ष, जिल्हा बालरोग तज्ज्ञ संघटना बुलढाणा,बालरोग शिशु तज्ज्ञ, बालगोपाल हॉस्पिटल बुलढाणा










