चांडोळ (हॅलो बुलढाणा/सलमान अत्तार )रस्ता हा विकासाचा प्रतीक मानला जातो. परंतु या रस्त्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे. लोकप्रतिनिधींना विनवणी करूनही रस्ता होत नाही. निवडणूक जवळ आल्या की या मुद्द्यांना धरून लोकप्रतिनिधी मत मागित असतात. एकीकडे रस्त्याची दुरावस्था झाल्याने ग्रामस्थ कंटाळले आहेत.
पाऊस पडताच सातगाव फाटा ते सातगाव वाहन चालवणे तर सोडा पायी चालणे कठिण झाले आहे. विदारक चित्र दिसून सुद्धा मासरूळ सर्कल मधील नेत्यांची चुप्पी तर आहेच कंत्राटदार,प्रशासन देखील झोपेत असल्याचा आरोप होत आहे.
बुलढाणा तालुक्यातील संभाजीनगर -बुलढाणा रस्त्यावर असलेल्या व मासरूळ जिल्हा परिषद सर्कल मध्ये येत असलेल्या सातगांंव फाटा ते कुलुमखेड पर्यंत ५,५०किमी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत मंजुर झाली आहे व संबंधित कंत्राटदाराने रस्त्याचे काम जून महिन्यापासुन सुरु केले आहे. सातगाव फाटा ते सातगावाचे अंतर १ किमीचा आहे.रस्त्याचे खोदकाम केल्याने रस्ता चिखलमय झाला आहे. थोडा जरी पाऊस पडला तरी रस्ता चिखलमय होतो. रस्त्यावर चिखल झाल्याने नागरीकांना वाहन चालवणे तर सोडा पायी चालणे कठीण होते अशी अवस्था या १ किमी रस्ताची झाली आहे. दुचाक्या चालकांना आपली दुचाकी चालवताना चांगलीच दमछाक करावी लागत आहे. सातगाव येथील नागरींकांचा मुख्य रस्ता हाच आहे. हयाच रस्त्याने धाड,बुलढाणा वापरावे लागते. संबंधित कंत्राटदाराने रोडची कामे करताना एका बाजुला नागरीकांना येण्या-जाण्यासाठी व्यवस्था करावी जणे करुन नागरीकांना त्रास होणार नाही. परंतु संबंधित रस्ता चिखलमय झाल्याने अनेक नागरीकांची तारांबळ उडत असून नागरीकांचा सुरक्षेचा प्रश्र्न ऐरणीवर असल्याचे चित्र सातगाव फाटा ते सातगाव रस्त्यावर दिसत आहे.
तरी संबंधित विभागाने व कंत्राटदार यांनी संभाजीनगर – बुलढाणा रस्त्यावर असलेल्या सातगाव फाटा ते सातगाव अशा १ किमी रस्ताची येण्या-जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी सातगाव येथील नागरीक करीत आहे.
▪️ कंत्राटदाराचा नियोजन शून्य कारभार
कंत्राटदाराच्या नियोजनशुन्य कारभारामुळे सातगाव (म्हसला ) येथील नागरीकांना नाहकचा त्रास सहन करावा लागत आहे. ऐन पाऊसाळयात रस्ता खोदल्याने नागरीकांना चिखल तुडवावा लागत आहे.थोडा जरी पाऊस पडला चिखल होते. चिखलामुळे पायी चालणे कठीण झाले आहे. अनेक दुचाक्या फसत आहे तरी संबंधित विभाग व कंत्राटदाराने नागरीकांची समस्या मिटवणे गरजेचे आहे.
-राहुल पालकर नागरीक सातगाव










