spot_img
spot_img

साखरखेर्ड्यात वाळूची तीन वाहनं अडली… ठाणेदार युवराज रबडेंच्या दोन धडक कारवायांत ४९.५६ लाखांची जप्ती!

सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा/वसीम शेख) मेहकर-चिखली मार्गावर रात्रीचे दहा वाजले होते. गस्तीवर असलेल्या साखरखेर्डा पोलिसांनी संशयावरून दहा चाकी हायवा अडवला. डंपर तपासला, तर त्यात सहा ब्रास वाळू! पोलिसांनी वाहतुकीचा परवाना मागितला, मात्र तो चालकाकडे आढळला नाही. ठाणेदार युवराज रबडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईत हायवा आणि वाळू असा २५ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

आचल वाईन शॉपसमोर हायवा थांबवून पोलिसांनी चालक बळीराम प्रकाश मुंढे (रा. नारायणखेड, ता. देऊळगाव राजा) याची चौकशी केली. पंचनाम्यानंतर २५ लाखांचा हायवा आणि २४ हजारांची वाळू पोलिसांनी ताब्यात घेतली. हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण इनामे यांच्या फिर्यादीवरून मुंढेविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

लव्हाळा फाट्यावर दोन ट्रक, दोन्हींत वाळू!

याच मार्गावर १५ नोव्हेंबरला सकाळच्या गस्तीत लव्हाळा फाट्यावर पोलिसांनी दोन ट्रक पकडले होते. दोन्ही ट्रकमध्ये प्रत्येकी चार ब्रास वाळू आढळली. नदीपात्रातून वाळू काढून तिची अवैध वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत २४ लाखांचे दोन ट्रक आणि ३२ हजारांची वाळू असा २४ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त झाला. चालक सौरभ दत्तात्रय म्हस्के (२३) आणि दीपक जनार्दन टाले (२४, दोघे रा. खैरव) यांच्याविरुद्ध कलम ३०३(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

दोन्ही कारवायांत मिळून तीन वाहने आणि १४ ब्रास वाळू असा ४९ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात आहे. दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास सहाय्यक फौजदार कडूबा डोईफोडे करीत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!