spot_img
spot_img

पहाटे ४.१५… पाठलाग, मारहाण अन् बळजबरीने नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप, ४२ वर्षीय आरोपीला अटक!अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून जळगाव जामोद पोलिसांची कारवाई, ‘पोक्सो’सह गुन्हा दाखल

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ ज्ञानदेव राजनकर) पहाटे मैत्रिणीसोबत चालायला निघालेल्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला मारहाण केली आणि बळजबरीने सोबत नेण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आहे. याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी ‘पोक्सो’सह गुन्हा दाखल करून ४२ वर्षीय आरोपीला अटक केली आहे

फिर्यादीनुसार, २६ नोव्हेंबर रोजी पहाटे सव्वाचार ते साडेचारच्या सुमारास दोघी गावातील एका प्रवेशद्वाराजवळून जात होत्या. त्या वेळी आरोपीने त्यांचा पाठलाग केला आणि फिर्यादीला चापटा व बुक्क्यांनी मारहाण केली, असा आरोप आहे. आरोपीने मुलीचा हात आणि मान पकडून तिचा विनयभंग केला, तसेच तिला बळजबरीने सोबत नेण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत नमूद आहे.

मुलीच्या फिर्यादीवरून त्याच दिवशी दुपारी ३ वाजून २३ मिनिटांनी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५, ७८, ७९, १२६, १२७ आणि ११५(१) तसेच ‘पोक्सो’ कायद्याच्या कलम ८ अंतर्गत गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पंडित करीत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!