मेहकर (हॅलो बुलढाणा) दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी निघालेल्या दुष्काळ संघर्ष यात्रेने मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांची मनं जिंकली आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखालील या यात्रेला मेहकर तालुक्यात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, गावोगावी शेतकऱ्यांनी यात्रेचं जंगी स्वागत केलं आहे.
यात्रेच्या मेहकर तालुक्यातील प्रवासादरम्यान प्रत्येक गावात शेतकरी बांधवांनी जोरदार स्वागत केलं. ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या रॅली, दुष्काळ एल्गार सभांना शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी उसळली होती. शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी बांधवांनी यात्रेला दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ या लढ्याला अधिक बळ देणारं ठरलं. मेहकर तालुक्यातील या संपूर्ण दौऱ्याचं अतिशय उत्कृष्ट नियोजन जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं. यात्रेचा मार्ग, गावोगावी संपर्क, सभांचे नियोजन, कार्यकर्त्यांमधील समन्वय आणि प्रत्येक ठिकाणी आवश्यक व्यवस्था उभी करण्यासाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली. तालुक्यातील प्रत्येक गावापर्यंत दुष्काळ संघर्ष यात्रेचा विचार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा आवाज पोहोचवण्यात त्यांच्या नियोजनाचा मोठा वाटा राहिला.
▪️दुष्काळाशी लढा आणखी तीव्र होणार!
मेहकरात मिळालेल्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे दुष्काळ संघर्ष यात्रा आणखी आक्रमक होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी हा लढा आता थांबणार नाही, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.













Total Users : 3821584