spot_img
spot_img

राहुल बोंद्रेंच्या नेतृत्वात काँग्रेसला बळ; एकनाथ कोरडेंचा जाहीर प्रवेश!

रायपूर (हॅलो बुलढाणा/सचिन जैस्वाल) चिखलीच्या राजकीय वर्तुळात पक्षप्रवेशाची घडामोड! रायपूरच्या शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष एकनाथ महादू कोरडे यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. अमरावती येथील विभागीय आढावा बैठकीत माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात त्यांनी जाहीर पक्षप्रवेश केला. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला जी. प्रसाद आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश झाला. यावेळी यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे, सुनील देशमुख, वीरेंद्र जगताप यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत कोरडे यांनी पक्षात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने संघटनेला बळकटी मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!