spot_img
spot_img

BIG BREAKING! पारखेड फाट्यापुढे अज्ञात वाहनाची भीषण धडक… नांदुरा रोडवर तिघे मोटारसायकलस्वार जागीच ठार!

मलकापूर (हॅलो बुलढाणा) नांदुरा रोडवर पारखेड फाट्याच्या पुढे जिओ पेट्रोल पंपाजवळ आज, १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास भीषण अपघात झाला. अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिली. या धडकेत मोटारसायकलवरील तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

दिगंबर चंद्रकांत इंगळे, मयूर निवास होले आणि परेश सुरेश घुले अशी मृतांची नावे आहेत. तिघे मलकापूर तालुक्यातील हरणखेड आणि घाणखेड येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. धडक देणाऱ्या वाहनाची ओळख अद्याप पटलेली नाही. अपघात नेमका कसा घडला, याबाबत अधिकृत तपशीलांची प्रतीक्षा आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!