बुलढाणा (हॅलो बुलढाणा), १५ नोव्हेंबर शहरातील धाड नाका परिसरात सरकारी तलावाजवळ आज सायंकाळी चारच्या सुमारास एका नवजात मुलीचा मृतदेह आढळला. प्राथमिक माहितीनुसार, मृतदेह वायरच्या थैलीत होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती बुलढाणा शहर पोलीस ठाण्याला देण्यात आली आहे.
बालिकेची ओळख अद्याप पटलेली नाही. तलावाकाठी ही थैली नेमकी कोणी आणि केव्हा ठेवली, याचीही माहिती समोर आलेली नाही. सायंकाळी चारच्या सुमारास मृतदेह आढळला, मात्र बालिकेचा मृत्यू नेमका कधी आणि कोणत्या परिस्थितीत झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. थैली तलावाजवळ कुठून आणली गेली, हाही प्रश्न अनुत्तरित आहे.
बालिकेची ओळख पटल्यावर आणि मृत्यूचे कारण स्पष्ट झाल्यावर या घटनेचा उलगडा होण्यास मदत होईल. दरम्यान, बुलढाणा शहर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे













Total Users : 3760818