चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) तालुक्यातील टाकरखेडा मुसलमान येथे गोपाल संजय पवार (वय ३०, रा. टाकरखेडा मुसलमान) यांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, वरदडा (ता. चिखली) येथील अजय उर्फ गोट्या पवार याने गोपाल पवार यांची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) यामावर, चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार भूषण गावंडे आणि अमडापूर पोलीस ठाण्याचे बालाजी सानप घटनास्थळी दाखल झाले आहेत. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, आता पोलिसांकडून समोर येणाऱ्या अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
गोपाल पवार यांच्यासोबत नेमकं काय घडलं? घटनेपूर्वी काय घडलं आणि हत्येमागे कोणतं कारण होतं, याबाबतचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. अजय उर्फ गोट्या पवार याच्यावरील आरोपाच्या अनुषंगाने पोलिसांकडून काय कारवाई होते, याकडेही लक्ष आहे. गुन्हा नोंदवण्यात आला आहे का आणि अटकेबाबत काय स्थिती आहे, याची अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळताच ‘हॅलो बुलढाणा’ पुढील अपडेट देईल.













Total Users : 3766388