चिखली (हॅलो बुलढाणा) वाढदिवस म्हटला की डोळ्यांसमोर येतो तो जल्लोष, उत्सव आणि आनंदाचा सोहळा, मात्र आपल्या आनंदात समाजातील गरजू, निराधार आणि ज्येष्ठ नागरिकांनाही सहभागी करून घेणे, हीच खऱ्या अर्थाने माणुसकी! याच माणुसकीचा सुंदर प्रत्यय चिखली शहरात पाहायला मिळाला.
चिखलीतील युवकांचे हृदयस्थान, सर्वांच्या सुख-दुःखात सदैव धावून जाणारे, आपल्या दयाळू स्वभावाने आणि सामाजिक कार्याने जनमानसात आपुलकीचे स्थान निर्माण करणारे दयावान फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रसिद्ध कांदा व्यापारी विलाससेठ चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
विलाससेठ चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मानवसेवा मल्टीपर्पज फाउंडेशन, चिखली द्वारा संचालित मानवसेवा प्रकल्पांतर्गत गजानन नगर, चिखली येथील मातोश्री कलाबाई वृद्धाश्रमात किराणा साहित्य भेट देण्यात आले.
वृद्धाश्रमातील आजी-आजोबांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन देण्यात आलेली ही मदत म्हणजे केवळ किराणा साहित्याची भेट नव्हती, तर त्यांच्या जीवनात आपुलकीचा आधार आणि मायेची ऊब निर्माण करणारा एक छोटासा प्रयत्न होता. आयुष्याच्या संध्याकाळी आधाराची आणि प्रेमाच्या दोन शब्दांची अपेक्षा असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अशा उपक्रमांचे मोल अनमोल असते. या उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्याची एक वेगळीच संकल्पना समाजासमोर आली. स्वतःच्या आनंदापेक्षा दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यात खरा आनंद असतो, हा माणुसकीचा संदेश या निमित्ताने देण्यात आला.
यावेळी दत्ता सुसर पाणीपुरवठा सभापती, प्रफुल्ल देशमुख, विलास मेरत वनाधिकारी, शुभम पडघान, निलेश चांदोरे, गणेश गाताडे आणि अण्णा जगताप व संचालक प्रशांत डोंगरदिवे यांची उपस्थिती होती.













Total Users : 3744187