spot_img
spot_img

BIG BREAKING! ‘बंदूकवाला’ व्हिडिओ, १० कोटींचा जुना आरोप… आता झोंगाबाईंच्या फिर्यादीवरून ढवळे पिता-पुत्रांवर पुन्हा गुन्हा! देऊळगाव साकर्शात पाच शेतकऱ्यांची ३३ लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप. तीन वर्षांपूर्वीचा तपास कुठवर? राजकीय पाठबळाच्या चर्चेत तथ्य किती?

मेहकर (हॅलो बुलढाणा) नातवासमोर ९३ हजार रुपये रोख मोजले. उरलेल्या १३ लाख ५० हजारांचा चेक दिला. महिनाभरात पैसे देण्याच्या बोलीवर २२२ क्विंटल सोयाबीन घेऊन गेले. महिना उलटला आणि ८६ वर्षीय झोंगाबाई रायसिंग चव्हाण पैसे मागायला गेल्या. त्यांना आणखी काही दिवस थांबायला सांगण्यात आलं. त्यानंतर दोघेही गाव सोडून गेल्याचं समजलं, असं झोंगाबाईंनी फिर्यादीत म्हटलं आहे. त्यांच्या तक्रारीवरून कैलास राधाकिसन ढवळे आणि आशिष कैलास ढवळे या पिता-पुत्रांविरुद्ध जानेफळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

डिसेंबर २०२२ च्या अखेरीस देऊळगाव साकर्शा येथे हा व्यवहार झाला. फिर्यादीनुसार, प्रतिक्विंटल ६,५०० रुपये दराने सोयाबीनची एकूण किंमत १४ लाख ४३ हजार रुपये ठरली होती. बाजारभावापेक्षा जास्त दर देण्याचं सांगून जिजाबाई अल्हाट, मोहन आमले, तुळशिराम माडोकार आणि बळीराम राठोड यांच्याकडूनही सोयाबीन व तूर घेतल्याचं फिर्यादीत नमूद आहे. झोंगाबाईंसह या पाच शेतकऱ्यांची ३३ लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.

तीन वर्षांपूर्वीही गुन्हा, तेव्हा १० कोटींचा आरोप!

ढवळेंविरुद्ध सुमारे तीन वर्षांपूर्वीही फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळच्या वृत्तात देऊळगाव साकर्शा आणि परिसरातील ३०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना जादा दराचं आमिष दाखवून उधारीवर शेतमाल घेतल्याचा आणि सुमारे १० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप प्रसिद्ध झाला होता. जानेफळ पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांनाही या व्यवहारांत आर्थिक फटका बसल्याचा दावा त्या वृत्तात करण्यात आला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही त्यावेळी पोलिसांकडे तक्रार दिली होती.

डीजेच्या तालावर बंदुकीसारखी वस्तू, जुन्या व्हिडिओत नेमकं काय?

माध्यमांकडे असलेल्या जुन्या व्हिडिओत डीजेच्या तालावर एका व्यक्तीच्या हातात बंदुकीसारखी वस्तू दिसत असल्याचा दावा आहे. त्या दृश्यात ढवळे आणि एक कारकून असल्याचं त्यावेळी सांगण्यात आलं होतं. व्हिडिओतील व्यक्तींची ओळख, चित्रीकरणाची तारीख आणि ती वस्तू नेमकी काय होती, याबाबत अधिकृत पुष्टी बाकी आहे. व्यापाऱ्याला राजकीय पाठबळ असल्याचीही चर्चा त्यावेळी झाली होती

पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर झोंगाबाईंच्या तक्रारीवरून भारतीय दंड विधानाच्या कलम ४०६, ४२० आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष जाधव यांच्याकडे आहे. तीन वर्षांपूर्वीच्या गुन्ह्याचा तपास कुठवर पोहोचला? आणि झोंगाबाईंच्या फिर्यादीनंतर समोर आलेल्या व्यवहारांपैकी किती व्यवहारांची नोंद त्या तपासात आहे? या प्रश्नांची उत्तरं आता जानेफळ पोलिसांकडून अपेक्षित आहेत

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!