किनगावराजा (हॅलो बुलढाणा) जेवणासाठी हॉटेलमध्ये गेले. बाहेर आले, तर जिथे दुचाकी उभी केली होती, तिथे जागा रिकामी! सिंदखेडराजा-मेहकर मार्गावरील पिंपळगाव लेंडी फाट्याजवळच्या ‘आमदार’ हॉटेलसमोरून २५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरीला गेल्याची फिर्याद राहुल गजानन जाधव (वय ३०, रा. किनगावराजा) यांनी दिली. १२ ऑक्टोबरच्या या घटनेप्रकरणी ११ नोव्हेंबरला गुन्हा दाखल झाला.
फिर्यादीनुसार, बुलढाण्यातील एचडीएफसी बँकेत नोकरी करणारे राहुल जाधव हे १२ ऑक्टोबरच्या रात्री रवि पालवे यांच्यासोबत बुलढाण्याहून किनगावराजाकडे येत होते. रात्री नऊच्या सुमारास दोघे जेवणासाठी थांबले. जाधव यांनी काळ्या रंगाची होंडा सीबी शाईन (MH 28 BD 3437) हॉटेलसमोर उभी केली. जेवण आटोपून बाहेर पडल्यावर दुचाकी दिसली नाही. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला, पण गाडीचा पत्ता लागला नाही.
ही दुचाकी राहुल यांचे भाऊ रामेश्वर गजानन जाधव यांनी २०१८ मध्ये खरेदी केली होती. खरेदीपासून राहुलच ती वापरत होते. अज्ञात व्यक्तीने दुचाकी चोरून नेल्याचा तोंडी अहवाल त्यांनी पोलिसांत दिला. त्यावरून किनगावराजा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला. ठाणेदारांच्या आदेशाने तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल नागरे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.













Total Users : 3743647