बुलढाणा (हॅलो बुलढाणा) वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब (उप-मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सोशल मीडिया बुलढाणा लोकसभा प्रमुख या पदावर श्री. किरण देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दि. ०६ नोव्हेंबर २०२६ रोजी हे नियुक्ती पत्र निर्गमित करण्यात आले असून, सदर नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असेल.
आजचा काळ हा सोशल मीडियाचा काळ आहे. घराघरात, तरुणांच्या मोबाईलमध्ये शिवसेनेचा विचार पोहोचवणे हीच खरी आजची गरज आहे. ही जबाबदारी आता किरण देशपांडे यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण, याचा आपण सक्रीयपणे प्रसार आणि प्रचार कराल, तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल, असा विश्वास नियुक्ती पत्रात व्यक्त करण्यात आला आहे. ही नियुक्ती शिवसेना सोशल मीडिया उप राज्य प्रमुख प्रतिक संध्या सुनिल शर्मा आणि शिवसेना सोशल मीडिया पश्चिम विदर्भ विभागीय प्रमुख सचिन रमाबाई गोपाल व्यास यांच्या स्वाक्षरीने जाहीर करण्यात आली आहे.
▪️बुलढाण्यात शिवसैनिकांमध्ये उत्साह..
या नियुक्तीमुळे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शासनाच्या योजना, शिवसेनेची भूमिका, हिंदुत्वाचा विचार आणि सामान्य जनतेचे प्रश्न आता अधिक जोमाने मांडले जाणार आहेत. किरण देशपांडे यांच्या नियुक्तीबद्दल बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





Total Users : 3723214