spot_img
spot_img

परड्याच्या सुपुत्राची भरारी! प्रेम गोपाल शिंबरे यांची ‘L&T’ कंपनीत यशस्वी निवड!

​मोताळा (हॅलो बुलढाणा) कोणतीही मोठी पार्श्वभूमी नसताना, केवळ उच्च ध्येय, खडतर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर जिद्द बाळगल्यास यश निश्चित मिळते, हे परडा (ता. मोताळा) येथील सुपुत्र प्रेम गोपाल शिंबरे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. आपल्या अहोरात्र अभ्यासानंतर आणि उत्कृष्ट कौशल्याच्या बळावर प्रेम शिंबरे यांची देशातील व जगातील अत्यंत नामांकित अशा ‘L&T’ (Larsen & Toubro) या बहुराष्ट्रीय कंपनीत निवड झाली आहे. त्यांच्या या घवघवीत यशाने संपूर्ण परडा गावासह बुलढाणा जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

▪️स्वतःच्या कष्टावर गाठले यश..

सामान्य कुटुंबातून आलेल्या प्रेम शिंबरे यांनी आपल्या शिक्षणादरम्यान कधीही संकटांना हरू दिले नाही. तांत्रिक शिक्षण घेत असताना त्यांनी आपल्या ध्येयावरून कधीच लक्ष विचलित होऊ दिले नाही. सातत्यपूर्ण मेहनत, प्रखर चिकाटी आणि तांत्रिक विषयांवर असलेली उत्तम पकड यांच्या जोरावर त्यांनी ‘L&T’ सारख्या अग्रगण्य कंपनीच्या कठीण निवड प्रक्रिया टप्प्यांना यशस्वीरीत्या पार केले. त्यांच्या या यशामागील त्यांची निष्ठा आणि कुटुंबाचे मोलाचे प्रोत्साहन प्रेरणादायी ठरले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!