spot_img
spot_img

हॅलो बुलढाणा EXCLUSIVE! आजीचा हात गेला… एसटीची माणुसकी हजार रुपयांत आटोपली? चिखलीतील दुर्घटनेत दुसऱ्या हाताची बोटेही निकामी; उपचारांचा खर्च उचलण्याचे आश्वासन कुठे गेले? केवळ हजार रुपये पाठवल्याचा नातेवाईकांचा आरोप; आता मदतीच्या आश्वासनाचा हिशेब कोण देणार?

चिखली (हॅलो बुलढाणा/सैय्यद साहिल) बसच्या चाकाखाली हात चिरडला… उपचारात एक हात कापावा लागला… दुसऱ्या हाताची बोटेही निकामी झाली! आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या दुर्घटनेनंतर एसटी प्रशासनाने मदतीपोटी अवघे एक हजार रुपये पाठवल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. उपचारांचा खर्च उचलण्याच्या आश्वासनाचे पुढे काय झाले, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

२९ ऑक्टोबर रोजी चिखली बसस्थानकात निर्मला आनंदराव देशमुख (वय ६४) या धोत्राभणगोजीकडे जाण्यासाठी आल्या होत्या. चालकाने चुकीच्या दिशेने बस आणल्यामुळे त्या चाकाखाली सापडल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. अपघातानंतर चालक निघून गेल्याचाही त्यांचा आरोप आहे. उपस्थित प्रवाशांनी तातडीने महिलेला बाहेर काढून खासगी रुग्णालयात दाखल केले.

उपचारादरम्यान त्यांचा एक हात कापावा लागला असून दुसऱ्या हाताची बोटेही निकामी झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. चिखली आगारप्रमुख जोगदंडे यांनी उपचारांचा संपूर्ण खर्च उचलण्याचे आश्वासन दिले; मात्र त्यानंतर विचारपूसही झाली नाही, असा नातेवाईकांचा आरोप आहे.

हजार रुपये पाठवले म्हणजे जबाबदारी संपली का?वृद्धेच्या उपचारांचा खर्च, पुढील शुश्रूषा आणि दैनंदिन जगण्याचा आधार कोण देणार? केवळ आश्वासनांनी त्यांच्या वेदना कमी होणार नाहीत. प्रशासनाने मदतीचा स्पष्ट तपशील जाहीर करून कुटुंबाला तातडीचा दिलासा द्यावा. बसस्थानकातील प्रवाशांच्या सुरक्षेबाबतही ठोस उपायांची गरज आहे.

ही दुर्घटना सर्वप्रथम ‘हॅलो बुलढाणा’ने समोर आणली होती. आता संबंधित चालकाच्या भूमिकेची चौकशी आणि प्रत्यक्ष मदतीच्या कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!