बुलढाणा (हॅलो बुलढाणा) एका भीषण धडकेने शिरसाट कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला! देऊळघाट रोडवर आज, १ नोव्हेंबरच्या सायंकाळी दुचाकी आणि चारचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत प्रतीक्षा विवेक शिरसाट (वय १३, रा. पाडळी ता.बुलढाणा) हिचा जागीच मृत्यू झाला. तिचे वडील विवेक संतोष शिरसाट (४०) आणि आई किरण विवेक शिरसाट (३५) गंभीर जखमी झाले.
प्राथमिक माहितीनुसार, हे कुटुंब बुलढाण्याहून पाडळीकडे त्यांच्या चारचाकी अल्टो MH12AN9666 ने जात होते. समोरुन येणाऱ्या स्विफ्ट डिझायर MH30AA7498 गाडीची समोरासमोर धडक झाली.जखमी आई-वडिलांना तातडीने बुलढाण्यातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांचा पुढील तपास सुरू असून चारचाकी चालकाबाबत सविस्तर माहिती अद्याप उपलब्ध नाही. प्रतीक्षाच्या अकाली मृत्यूने पाडळी गावावर शोककळा पसरली आहे.





Total Users : 3701426