spot_img
spot_img

रात्री वाद मिटला… सकाळी गळ्यावर चाकूचे तीन वार! देवधाब्यात घरकुलाच्या वादातून रक्तरंजित थरार! ‘रात्री लोकांमुळे वाचला, आता जिवाने मारतो!’ धमकी देत शेजाऱ्याने हल्ला केल्याचा वृद्ध मजुराचा आरोप

मलकापूर (हॅलो बुलढाणा/करन झनके) घरकुल बांधण्याच्या जागेवरून रात्री झालेला वाद गल्लीतील नागरिकांनी मिटवला; मात्र दुसऱ्याच दिवशी सकाळी शेजाऱ्याने गळ्यावर धारदार चाकूने तीन वार केल्याचा गंभीर आरोप देवधाबा येथील किशोर प्रल्हाद सोनोने (वय ६०) यांनी केला आहे. १ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेबाबत त्यांनी रुग्णालयात जबाब दिला.

सोनोने यांच्या जबाबानुसार, घरकुलासाठी जुन्या घराचे0 टिनपत्र काढल्यानंतर जागेच्या कारणावरून सुधाकर मधुकर जावरे याच्याशी ३१ ऑक्टोबरच्या रात्री वाद झाला. नागरिकांनी समजूत घातल्यानंतर जावरे तेथून निघून गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी शौचासाठी जात असताना विश्वनाथ साबळे यांच्या घरासमोर जावरे याने अडवले. ‘रात्री तू लोकांमुळे वाचला होता, आता तुला जिवाने मारतो,’ असे म्हणत गळ्यावर सलग तीन वार केल्याचे सोनोने यांनी जबाबात म्हटले आहे.

रक्तबंबाळ अवस्थेत सोनोने भाऊ राजू यांच्या घरी पोहोचले. भावाने वाहन बोलावून त्यांना मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून बुलढाण्याला पुढील उपचारासाठी पाठवले; मात्र भावाने त्यांना मलकापूरच्या येवले रुग्णालयात दाखल केले.

सोनोने यांच्यावर उपचार सुरू असून, जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला झाल्याची त्यांची तक्रार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!