मेहकर (हॅलो बुलढाणा) पेनटाकळी प्रकल्पातून मेहकर नदीपात्रात पाणी सोडा; अन्यथा थेट नदीपात्रात आमरण उपोषणाला बसणार, असा इशारा मेहकर-लोणार शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार संजय रायमुलकर यांनी दिला आहे. शासनाच्या निकषांनुसार आणि उपलब्ध पाण्याच्या नियोजनानुसार पाणी सोडण्याची त्यांची मागणी आहे. ‘शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी आमचा निर्धार अढळ आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले. सत्ताधारी गटातील माजी आमदारांनीच उपोषणाचा इशारा दिल्याने पाणीप्रश्नावर प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. आता पाणी सोडण्याचा निर्णय होणार की रायमुलकरांना नदीपात्रात उपोषणाला बसावे लागणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे





Total Users : 3695816