spot_img
spot_img

BIG BREAKING! कुऱ्हाड घाटबोरीत… लाकडाचा बाजार नागपुरात; येवले साहेब, पहारा होता कुठे? २२१ झाडांची तोड, ५३ लाखांच्या वनसंपदेचा सवाल! ‘हॅलो बुलढाणा’चा आठ दिवसांत चौथा दणका; दोघांना अटक, आडतदाराची चौकशी… येवलेंकडून तपास काढला, आता ‘मोठ्या साहेबां’च्या जबाबदारीची फाईल उघडणार का?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा विशेष) जंगलात झाडे पडत होती… ट्रक भरून सागवान नागपूरला जात होते… अन् लाखोंच्या लाकडाची विक्रीही होत होती! मग जंगलाचे रखवालदार करत होते काय? घाटबोरीतील सागवान लुटीचे प्रकरण जिल्ह्यात सर्वप्रथम लाखो वाचकांसमोर आणणाऱ्या ‘हॅलो बुलढाणा’च्या आठ दिवसांच्या वृत्तमालिकेतील हा चौथा दणका! सुरुवातीलाच मांडलेले नागपूर कनेक्शन आता तपासाच्या केंद्रस्थानी आले आहे.

१०३ थुटांपासून सुरू झालेले प्रकरण थेट २२१ झाडांच्या तोडीपर्यंत पोहोचले आहे! भोसा येथील वनकक्ष क्रमांक १८१ मध्ये १४५ सागवान झाडांची तोड, तर लगतच्या ई-क्लास महसूल क्षेत्रात ७६ थुटांची नोंद झाली. या लाकडाचे मूल्य तब्बल ५३ लाख २४ हजार ७१० रुपये असल्याचे वनविभागाने म्हटले आहे.

येवलेंकडून तपास काढला; आता जबाबदारी कोणाची?

वनपरिक्षेत्र अधिकारी अंकुश येवले यांच्याकडील तपास सहाय्यक वनसंरक्षक वैभव काकडे यांच्याकडे सोपविण्यात आला. संबंधित वनरक्षक आणि वनपाल निलंबित झाले. मात्र, जुलैपासून तोड सुरू होती, तर गस्तीत ती आधी का दिसली नाही? झाडे तोडण्यापासून वाहतुकीपर्यंतची साखळी कुणाच्या नजरेतून सुटली? कारवाईची कुऱ्हाड वरिष्ठांच्या जबाबदारीपर्यंत पोहोचणार का?

नागपूरचा आडतदार चौकशीच्या फेऱ्यात!

राहुल मेहेत्रेनंतर भारत तिवालेला अटक करण्यात आली; न्यायालयाने त्याला पाच दिवसांची वनकोठडी दिली. भोसा येथून लाकूड नागपूरला नेऊन दलालामार्फत विकल्याचे तपासात समोर आले. नागपूरच्या आडतदाराला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली आहे.

जेसीबी, ४०७ टेम्पो, हायड्रा, ट्रॅक्टर, कटर आणि कुऱ्हाडी असा ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त झाला. कर्मचारी सहभागासह इतर आरोपींच्या चौकशीसाठी कमलेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे.

मागील वर्षातील सरकारी ई-क्लास आणि आदिवासी खासगी जमिनीवरील विनापरवाना वृक्षतोड व वाहतुकीचाही तपास सुरू आहे. ई-क्लासमधील तोडीबाबत डोणगाव पोलिसांत तक्रार दाखल झाली असून पोलीस स्वतंत्र तपास करत आहेत

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!