spot_img
spot_img

मिरवणुकीच्या बंदोबस्तात घोणस आढळला; रायपूर पोलिसांची तत्परता, नागरिकांची सुरक्षा अन् सापालाही जीवदान!सर्पमित्र संदीप कांबळेंच्या मदतीने सुरक्षित सुटका; खाकीच्या सतर्कतेला संवेदनशीलतेची जोड!

रायपूर (हॅलो बुलढाणा/सचिन जयस्वाल) दुर्गा देवीच्या मिरवणुकीचा बंदोबस्त सुरू असतानाच अत्यंत विषारी घोणस साप आढळला. मात्र, रायपूर पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता परिस्थिती हाताळली. नागरिकांचा संभाव्य धोका टाळतानाच सापालाही जीवदान देत पोलिसांनी कर्तव्यदक्षतेसोबत संवेदनशीलतेचाही प्रत्यय दिला.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांच्या नजरेस हा साप पडला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तत्काळ रायपूर येथील सर्पमित्र संदीप कांबळे यांना पाचारण केले. कांबळे यांनी घटनास्थळी पोहोचून योग्य खबरदारी घेत घोणसाला सुरक्षितरीत्या पकडले. त्यानंतर त्याला वनविभागाच्या जंगल परिसरातील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

पोलीस स्टेशन रायपूरचे ठाणेदार निलेश सोळंके यांच्या उपस्थितीत ही कार्यवाही करण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल राहुल जाधव, अनंत कळमकर आणि सागर कोरडे यांनी सहकार्य केले. पोलिसांचा तातडीचा प्रतिसाद आणि सर्पमित्राचे कौशल्य यामुळे संभाव्य धोका टळला.

सणाच्या बंदोबस्तात प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पार पाडताना पोलिसांनी समोर आलेल्या या धोक्याकडेही दुर्लक्ष केले नाही. सर्पमित्राला तातडीने बोलावण्याचा निर्णय नागरिकांची सुरक्षितता आणि वन्यजीवाचे संरक्षण या दोन्ही दृष्टींनी महत्त्वाचा ठरला. सतर्क नजर आणि वेळेवर कृती यांची सांगड या कार्यवाहीत दिसली

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!