spot_img
spot_img

१५० शेतकऱ्यांच्या वाटेत अडथळा… अन् प्रशांत पाटील मैदानात उतरले! अखेर १ कोटी २० लाखांचा पूल मंजूर नव्हे, थेट कामाला सुरुवात; घाटबोरीत पाटलांच्या पाठपुराव्याचा दणका!

मेहकर (हॅलो बुलढाणा) रस्ता बंद, शेतीची कामे ठप्प अन् १५० शेतकऱ्यांची कोंडी! मात्र शेतकऱ्यांच्या हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हा सरचिटणीस प्रशांत पाटील मैदानात उतरले आणि अखेर प्रशासनाला दखल घ्यावी लागली!

घाटबोरी मुख्य रस्त्याच्या दुपदरीकरणामुळे लोणी गवळी येथील शेतकऱ्यांचा शेतात जाण्याचा मार्ग बंद झाला होता. आंदोलन, उपोषणाचा इशारा आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तब्बल १ कोटी २० लाख रुपये खर्चाच्या पुलाचे बांधकाम सुरू केले आहे.

या लढ्यात संजय इनामदार, विठोबा नरवाडे, गजानन मगर, प्रल्हाद जागृत, अगंदराव भालेराव, राजेश इनामदार, संतोष भांबे, सुभाष राइतकर, पिंटू रणपिसे, मधुकर खंडारे, शरद चंद्रे, माधवराव पाटील आणि सचिन जाधव यांनी विशेष प्रयत्न केले.शेतकऱ्यांच्या एकजुटीने आणि प्रशांत पाटलांच्या पाठपुराव्याने अखेर १५० शेतकऱ्यांच्या शेतरस्त्याचा प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!