spot_img
spot_img

EXCLUSIVE! पावसाने मारलं, आता जनावरांच्या पोटासाठी बळीराजा रानोरान फिरू लागला! मलकापूर पांग्र्यात सोयाबीनच्या भुशासाठी शेतकऱ्यांची जीवघेणी धावपळ; शिवारात दुष्काळाचे चटके, गोठ्यात उपासमारीची धास्ती! आज भुशासाठी वणवण… उद्या मुक्या जनावरांच्या तोंडात काय घालणार? प्रशासनाला संकटाची चाहूल लागणार कधी?

सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा / वसीम शेख)
पावसाने पाठ फिरवली… शेतातील पिकांनी मान टाकली… अन् आता मुक्या जनावरांच्या पोटाची खळगी भरायची कशी? हाच जिवघेणा प्रश्न सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे!

मलकापूर पांग्रा परिसरात दुष्काळसदृश परिस्थितीचे चटके बसू लागले असून, शेतकरी आता सोयाबीनचा भुसा गोळा करण्यासाठी अक्षरशः जीवाचे रान करत आहेत. ट्रॅक्टर, बैलगाड्या आणि मोठ्या वाहनांतून भुसा वाहून नेण्याची लगबग सुरू आहे.

एकीकडे पिकांची वाताहत, दुसरीकडे जनावरांच्या चाऱ्याची चिंता! निसर्गाच्या या दुहेरी संकटाने बळीराजाचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. आज मिळेल तो भुसा साठवून ठेवण्याची धडपड सुरू असून, उद्या जनावरांच्या तोंडात काय घालायचे, या चिंतेने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.

शेतकऱ्याच्या ताटात भाकरीची चिंता, तर गोठ्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न! अशी विदारक परिस्थिती निर्माण होत आहे. दुष्काळाचे सावट अधिक गडद होण्यापूर्वी प्रशासन चारा नियोजनासाठी पुढे सरसावणार, की बळीराजाला आपल्या मुक्या जनावरांसाठीही संघर्ष करावा लागणार?

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!