spot_img
spot_img

EXCLUSIVE “रिटायर झाल्यावर माझा शिक्षक पानटपरी टाकतो, भाजी विकतो… हीच का गुरूची दशा?” डि एस लहाने सर हॅलो बुलडाणाच्या स्टुडिओत भावूक! म्हणाले…

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) “मी स्वतः शिक्षक आहे, मला शिक्षकाचे दुःख कळते…” असे म्हणताच अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाचे उबाठा गटाचे अधिकृत उमेदवार प्रा. डी. एस. लहाने सर हॅलो बुलडाणा स्टुडिओत भावूक झाले.

हॅलो बुलडाणा स्टुडिओला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी शिक्षकांच्या व्यथा अत्यंत अभ्यासपूर्ण आणि काळजाला भिडणाऱ्या शब्दांत मांडल्या. स्टुडिओत बोलताना लहाने सर म्हणाले “तो शिक्षक नाही, माझ्या कुटुंबातील सदस्य आहे” शिक्षक मतदार हा सर्वात हुशार मतदार आहे. तो भावनेत नाही, विचाराने मतदान करतो. माझा एक-एक शिक्षक मतदार नाही, तर माझ्या कुटुंबातील सदस्य आहे. त्याच्या डोळ्यातील पाणी मला दिसते. जुन्या पेन्शन संदर्भात बोलताना ते म्हणाले की,
“जुनी पेन्शन ही भीक नाही, हक्क आहे”

आज २० वर्ष सेवा करून रिटायर झालेला माझा शिक्षक बांधव पानटपरी टाकतोय, दुसऱ्याच्या शेतात मजुरी करतोय, भाजीपाला विकतोय. इतकी दयनीय अवस्था गेल्या १० वर्षात झाली आहे. जुनी पेन्शन योजना आणि १००% अनुदान हे दोनच माझे अजेंडे आहेत. विधान परिषदेच्या पायऱ्यांवर शिक्षकांना घेऊन बसण्याची वेळ आली तरी मी बसेन, पण हे प्रश्न सोडवूनच राहणार. आजपर्यंत कोणत्याच आमदाराने पायऱ्यांवर आंदोलन केले नाही, मी करणार. पुढे त्यांनी इंग्रजी शाळेतील शिक्षकांचा मुद्दा मांडला.. “इंग्रजी शाळेतील शिक्षकाला वालीच नाही”
इंग्रजी माध्यमाच्या सेल्फ फायनान्स शाळेतील शिक्षकाची अवस्था तर त्याहून वाईट आहे. सरकारने RTE चे २५% विद्यार्थ्यांचे पैसे ५-६ वर्षांपासून थकवले आहेत. संस्थाचालक कर्ज काढून शाळा चालवतोय. या शाळेला साधा आमदार निधी नाही, लाईट बिल सुद्धा कमर्शियल दराने. या शिक्षकाला किमान वेतन नाही, मेडिक्लेम नाही, अनुभव ग्राह्य धरला जात नाही. हे बदलायचेच आहे, असे लहाने सर म्हणाले.

▪️”शिक्षकाला शिकवूच दिले जात नाही!”

शिक्षकाला निवडणूक, जनगणना, BLO अशी अशैक्षणिक कामे लावली जातात. अंगणवाडी सेविका सुद्धा नकार देते, पण माझा शिक्षक गप्प बसतो, कारण त्याच्या पाठीशी कोणीच नाही. मी विधान परिषदेत गेलो तर अशैक्षणिक कामे लावण्याला ठाम अटकाव करणार. या एक तासाच्या मुलाखतीत लहाने सरांनी आकडेवारीसह प्रश्न मांडल्याने संपूर्ण स्टुडिओ भारावून गेला होता. त्यांच्या या तळमळीला अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या पाचही जिल्ह्यांतील शिक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!