बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरासाठी विविध जलस्रोतांतून पाणी पुरवठ्यावर लाखो रुपये खर्च होत असताना, शहरातील त्रिशरण चौक व चिखली- बुलढाणा रोडवरील जलवाहिनीच्या व्हॉलला मोठी गळती लागल्यामुळे व जुन्या पाईपलाईला नवे भासवून जलवाहीनी फुटल्यामुळे पिण्याच्या पाण्याची प्रचंड नासाडी होत आहे.याकडे नगरपालिकेचे मात्र दुर्लक्ष होताना दिसते.आता या पाणी गळतीचा लाभ भटके आंघोळ व धुणे धुण्यासाठी करत आहे.हे ठीक असले तरी,पूर्व सूचना न देता पिण्याचे पाणी सहा ते आठ दिवसानंतर मिळत असल्याने बुलढाणेकरां कडून संताप व्यक्त होत आहे.
येळगाव येथील स्वर्गीय भोंडे जलाशयात यावर्षी पैनगंगेला पूर आल्याने धरणात काठोकाठ पाणी होते.आता ८० टक्के पाणी उपलब्ध आहे परंतु बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव सारख्या जलस्रोतांतून पाणी आणून,त्यावर शुद्धीकरणासाठी नगरपालिका मोठा खर्च करते मात्र
सदर ठिकठिकाणच्या व्हॉलमधून चोवीस तास पाणी वाहत असून,या गळतीच्या ठिकाणाहून १३ लीटर क्षमतेची बादली केवळ ५५ सेकंदात भरली जाते. म्हणजेच शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. येळगावच्या भरलेल्या जलाशयामुळे बुलढाणा शहर आणि परिसरातील १५ गावांचा आगामी काळातील पाणीप्रश्न सुटला असून नागरनिकांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे मानले जात आहे. परंतू व्हॉलमधून वा पाईपलाईन मधून चोवीस तास पाणी वाहत राहीले तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालीआहे.
▪️प्रतिदिन ९० लाख लीटर पाण्याची उचल
बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता १२.४० दलघमी (दशलक्ष घनमीटर) इतकी आहे.चांगल्या पावसामुळे हे धरण १०० टक्के भरले.या धरणातून प्रतिदिन ९० लाख लीटर पाण्याची उचल होते. उन्हाळ्यात मात्र पाणी टंचाई जाणवते.सध्या ६ ते ८ दिवसातून एकदा नियोजन शून्य पाणीपुरवठा केला जात आहे.अवैध मोटारपंप लावून पाणी उपसा होत असल्याने याकडे नगर पालीकेने लक्ष देऊन कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
▪️नगरपालिकेची उडवा उडवीची उत्तरे..!
जुनी पाईपलाईन एकदम व्यवस्थित असतांना सुद्धा नवीन पाईपलाईन टाकून करोडो रुपयांचा खर्च करण्यात आला असून नवीन पाईप लाईन मधून पाहिजे तसा पाण्याचा फोर्स प्रवाह नाही.पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी अधिकारी यांची उत्तरही गोलमाल आहेत.अशा तक्रारी प्रत्येक प्रभागातून डोके वर काढत आहे.
क्रमशः




Total Users : 3577804