बुलडाणा (हॅलो बुलढाणा) निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या SIR (Special Intensive Revision) च्या नावाखाली महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये लाखो गरीब, दलित, अल्पसंख्याक मतदारांची नावे बेकायदेशीरपणे वगळली जात आहेत. हा संविधानाच्या कलम ३२६ वरील हल्ला असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे.दरम्यान
मतदार गायब करण्याचा हा डाव असून, निवडणूक आयुक्तांनी खुर्ची खाली करावी,अशी मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात आज मविआच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पक्षपाती भूमिका घेत सत्ताधारी भाजपला मदत केल्याचा आरोप करण्यात आला. BLO वर दबाव टाकून, पूर्वसूचना न देता नावे वगळली जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
SIR ला स्थगिती द्यावी, वगळलेली नावे पुनर्स्थापित करावीत आणि ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशा तीन मागण्या करण्यात आल्या आहेत.यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.यावेळी प्रकाश पाटील, प्रसेनजीत पाटील, नरेश शेळके, जालिंदर बुधवत, गजानन वाघ, जयश्री शेळके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




Total Users : 3572059