देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) कव्वालीच्या कार्यक्रमानंतर लहान मुलांच्या वादावरून राजकीय वाद विकोपाला गेला आणि रक्ताचा सडा पडल्याने काल रात्री देऊळगाव राजा अक्षरशः हादरले. दोन गटातील तुंबळ हाणामारीत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक अनवर शेख व राष्ट्रवादी अजित पवार गटाशी संबंधित आरिफ शेख यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन गटातील परस्परांविरुद्ध आरोपींवर गुन्हे दाखल केले असून 20 जणांना ताब्यात घेतले आहे.
पोलीस सूत्रानुसार, देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात फिर्यादी शेख अतिक शेख उमर रा. प्रताप नगर देउळगांव राजा यांनी तक्रार दिली की, 5 समोर रोजी प्रतापनगर, भोलेशहा दर्गा जवळील रोडवर आरोपी शेख अकीब शेख पाशु रा. देऊळगाव राजा तसेच इतर यांनी हातात चाकू, लाकडी दांडा, कुऱ्हाड घेऊन, गैरकायद्याची मंडळी जमवून, कट कारस्थान रचले होते. पुर्व नियोजीत पध्दतीने, हत्याराच्या सहायाने, जिवाने मारण्याच्या उदेश्याने फिर्यादीचे नातेवाईकांच्या घरात व घराबाहेर हमला केला. फिर्यादीचे नातेवाईक आसीफ उर्फ आरीफ हारुन पठान (वय 35 वर्ष) देउळगांव राजा यांना चाकुने व कुऱ्हाडीने जबर मारहान करुन, गंभीर जखमी करुन, त्याचा खुन केला. तसेच फिर्यादीच्या इतर नातेवाईकांना गंभीर रित्या जखमी करुन, जिवाने मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. अशा फिर्यादवरुन आरोपी विरुध्द् पो.स्टे. देऊळगांव राजा येथे अप.क्र. 450 / 2026 कलम 103 (2), 109, 333, 61 (b), 189 (4),189 (5),190,191 (1), 191 (3), 118 (1), 115 (2), 352, 351 (2), 351 (3) भा. न्या. सं. प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
▪️दुसऱ्या फिर्यादीची बाजू!
तर घटनेतील दुसरे फिर्यादी शेख मुजाहिद शेख अली वय 46 वर्षे, रा. हाकीम कॉलनी, देउळगांव राजा यांनी फिर्याद दिली की, 5 ऑक्टोंबर रोजी प्रतापनगर, भोलेशहा दगर्गा जवळ आरोपी शाहरुख खान अहमद खान रा. देऊळगांव राजा तसेच इतर यांनी कट रचुन फिर्यादी व फिर्यादीचा भाऊ यांचेकडे पाहून, ‘कल इसके बच्चेने हमारे लड़को के साथ झगडे करे, इनको आज जानसे मार डालो’ असे म्हणुन हातात काठी, चाकु, लोखंडी रॉड घेवुन जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला करुन, फिर्यादीचा भाऊ शेख अनवर उर्फ अनु शेख अली वय 42 वर्ष रा हकीम कॉलनी देउळगांव राजा यास लोखंडी रॉड, चाकु, काठ्यांनी जबर मारहाण करुन, गंभीर जखमी करुन, त्याचा खून केला तसेच फिर्यादी व साक्षीदारांना शिवीगाळ करुन मारहाण केली तसेच त्यांना जिवाने मारण्याची धमकी दिली. अशा फिर्यादवरुन आरोपी विरुद् पो.स्टे. देऊळगांव राजा येथे 314.5.451/2026 H 103 (2), 61(2), 118(1), 189 (2), 189(4), 189(5), 190, 191(1), 191(3), 115 (2), 352, 351(2), 351(3) भा. न्या. सं. प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
▪️एस पी निलेश तांबे यांची कार्यतत्परता!
गुन्ह्याची गंभीरता व संवेदनशिलता लक्षात घेऊन एसपी निलेश तांबे यांनी घटनास्थळाला भेट देऊन, गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करणे, परिसरात कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवणे बाबत सुचना दिल्या. सदर गुन्ह्यातील आरोपींच्या शोधासाठी पो.स्टे. देऊळगांव राजा आणि स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा यांची स्वतंत्र पथके नियुक्त् करण्यात आली असून, अद्याप पावेतो वरील गुन्ह्यांमध्ये 20 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. उर्वरीत आरोपींचा पथकां कडून शोध घेण्यात येत आहे. स्थानिक पोलीस दंगल नियंत्रण पथक, क्यु. आर. टी. पथक यांचा चोख पोलीस बंदोबस्त् नेमण्यात आलेला असून परिस्थिती पुर्णपणे नियंत्रणात आहे. सदर गुन्ह्यांचा पुढील तपास पो.नि ब्रम्हा गिरी व सपोनि. सविता कुवारे, पो.स्टे. देऊळगांव राजा करीत आहेत.




Total Users : 3565900