डोणगाव (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) डोणगाव पोलीस ठाण्याच्या वाहनाचा २ ऑक्टोबर रोजी शुक्रवारी रात्री सुमारे ९ वाजेच्या दरम्यान राज्य महामार्गावर एका वाईन बारसमोर अपघात झाला. MH 28 BK 4188 क्रमांकाच्या या पोलीस वाहनाचा समोरील एक्सल तुटल्याने वाहन रस्त्यावरच थांबले. सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी झाली नाही.
अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली.
या घटनेनंतर पोलीस वाहनांच्या देखभाल-दुरुस्तीचा मुद्दा चर्चेत आला आहे. वाहनाचे एक्सल तुटण्यामागे नेमके कारण काय? वाहनाची नियमित तपासणी करण्यात आली होती का? याबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहेत.
विशेष म्हणजे, अपघाताच्या वेळी हे पोलीस वाहन नेमके कुठे आणि कोणत्या कामासाठी जात होते, याबाबतही नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. या घटनेची अधिकृत माहिती अथवा अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी डोणगाव पोलीस ठाण्याच्या वाहनांची देखभाल, वापर आणि सदर घटनेची वस्तुस्थिती याकडे विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.












Total Users : 3543721