spot_img
spot_img

बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या! बुलढाणा शहर पोलिसांनी जपली दुष्काळाची जाणीव

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद असताना बुलढाणा शहर पोलीस स्टेशनने यंदा गणेश विसर्जनात दिखावा टाळत साधेपणाचा आदर्श घालून दिला. पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनच्या गणपती बाप्पाचे भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. यावेळी पीएसआय धारकरी, संतोष वाघ, विशाल बनकर, साहिल पठ्ठे, मनोज सोनवणे, विवेक तायडे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दुष्काळी परिस्थितीची जाणीव ठेवत कोणताही अनावश्यक गाजावाजा न करता बाप्पाला निरोप देत शहर पोलिसांनी समाजासमोर संयम, संवेदनशीलता आणि जबाबदारीचा वेगळा संदेश दिला

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!