spot_img
spot_img

BIG UPDATE! चिखलीत मध्यरात्री राजकीय तापमान ‘हाय’! राहुल बोंद्रे यांच्या घरासमोर 400 ते 500 समर्थकांची गर्दी; “राहुलभाऊ तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं!”च्या घोषणांनी राजा टॉवर परिसर दणाणला!

चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल)भाजप प्रवेशाच्या पूर्वसंध्येला माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या भोवती सुरू झालेल्या राजकीय घडामोडीला आता आणखी मोठा ट्विस्ट मिळाला आहे!

आताच मिळालेल्या माहितीनुसार चिखलीतील राजा टॉवर परिसरातील राहुल बोंद्रे यांच्या निवासस्थानासमोर शेकडो समर्थकांनी गर्दी केली आहे.घटनास्थळावरील माहितीनुसार जवळपास 400 ते 500 कार्यकर्ते आणि समर्थक घरासमोर जमा झाले असून परिसर अक्षरशः घोषणांनी दणाणून गेला आहे.

“राहुलभाऊ तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं!” अशा घोषणा देत समर्थकांनी बोंद्रे यांच्या समर्थनार्थ जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे.

खासदार राहुल गांधी यांच्याशी फोन संवादानंतर बोंद्रे भावूक झाल्याची चर्चा आणि त्यानंतर अचानक त्यांच्या निवासस्थानाबाहेर जमलेला समर्थकांचा हा मोठा जमाव यामुळे चिखलीच्या राजकारणातील सस्पेन्स आणखी वाढला आहे.

उद्या २२ सप्टेंबर रोजी मुंबईत भाजप प्रवेशाचा कार्यक्रम असल्याचे बोंद्रे यांनी यापूर्वी जाहीर केले आहे. मात्र आता समर्थकांची ही गर्दी नेमका कोणता राजकीय संदेश देत आहे, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.राहुल बोंद्रे भाजप प्रवेशावर ठाम राहणार… की रातोरात राजकीय चित्र बदलणार?

हॅलो बुलढाण्याच्या नजरा राजा टॉवरवर! पुढील BIG UPDATE लवकरच!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!