spot_img
spot_img

EXCLUSIVE ‘क्या बात है!’ वाहतूक पोलीस नरेश रेड्डी यांची कर्तव्याला सामाजिकतेची जोड! संभाव्य अपघात टाळण्यासाठी चौकातील उपक्रम चर्चेत!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) गणेशोत्सवादरम्यान वाहतुकीस अडथळा येऊ नये आणि अपघातांची शक्यता टाळावी यासाठी बुलढाणा वाहतूक शाखेचे कर्मचारी नरेश रेड्डी यांनी स्वतःच्या खिशातून खर्च करून येथील तहसील चौकातील तुटलेल्या सिग्नलच्या पाईपला जुने टायर लावून तात्पुरतीप्रभावी दुरुस्ती केली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यांनी घेतलेल्या या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

काही वाहतूक पोलिस कडक ऊन, पाऊस किंवा थंडीची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र रस्त्यावर कर्तव्य बजावतात.शहरांमधील रस्ते सुरळीत ठेवणे आणि वाहतूक कोंडी टाळून ते वाहतुकीवर नियंत्रण ठेवतात.रस्ता सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करून शिस्त निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अपघाताच्या वेळी तत्परता दाखवून जखमींना मदत करणे आणि आपत्कालीन यंत्रणेशी समन्वय साधतात.वाहतूक शाखेचे कर्मचारी नरेश रेड्डी यांची कर्तव्यनिष्ठा लक्ष वेधणारी आहे. समाजभान राखत रेड्डी यांनी वर्दळीच्या तहसील चौकात स्वखर्चाने तुटलेल्या सिग्नलच्या पाईपला जुने टायर लावून रंगरंगोटी करत तात्पुरती व प्रभावी दुरुस्ती केली.त्यांचा हा उपक्रम सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!