बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यात फोफावलेल्या बेकायदा धंद्या विरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने करून आंदोलनाचा इशारा देणारे शिंदे सेनेचे आ.संजय गायकवाड यांचे नाव न घेता त्यांच्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ‘उलटा चोर कोतवाल को दाटे‘ या जुन्या म्हणीची आठवण करून देत, आ. संजय गायकवाड व आ.श्वेता महाले यांच्यातील वादाला मनारंजन म्हटले आहे.स्पर्धा असायला हवी परंतु ती विकास कामाच्या आणि भ्रष्टाचार निर्मूलनाची असावी,असा टोला आपल्या शैलीत लगावला.
आमदार संजय गायकवाड व आमदार श्वेता महाले यांच्यातील कलगीतुरा रंगलेला आहे. परस्परांना या ना त्या कारणाने डिवचणे सुरू आहे.यासंदर्भात मीडियाने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना शिंदे सेनेचे आमदार अवैध धंद्याविरुद्ध उपोषण करणार असल्या संदर्भात प्रश्न केला असता, हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रश्नाला उत्तर दिले.ते म्हणाले की, शिंदे सेनेची जी मंडळी अवैध धंद्या विरुद्ध उपोषण करायला निघाली आहे, त्याच मंडळीचे जुगार, तितली भवरा, वाळू तस्करी, गांजा, गुटखा असे कितीतरी अवैध धंदे आहेत. त्यामुळे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ ही म्हण आठवली आहे.परंतु या प्रस्तावित आंदोलनाचे काय झाले? कोणती मांडवली झाली? माहीत नाही. पण हा मनोरंजनाचा भाग असावा असा चिमटा ही हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी काढला.












Total Users : 3483065