spot_img
spot_img

EXCLUSIVE भेटींचा उत्सव, शक्तीप्रदर्शनाचा ध्यास! राजकीय नेत्यांकडून गणेशोत्सव ‘हायजॅक’?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा/प्रशांत खंडारे) दहीहंडी, गणेशोत्सवाचा काळ हा केवळ धार्मिक सण न राहता राजकीय नेत्यांसाठी जनसंपर्क आणि शक्तीप्रदर्शनाचा एक महत्त्वाचा मंच बनलाय. तत्पूर्वीच वारेमाप पैसे खर्ची घालून चिखलीत व धाड मध्ये रंगलेली दहीहंडी बुलढाणेकरांनी अनुभवली आहे.आ.संजय गायकवाड व आ. श्वेता महाले यांच्यात रंगलेले वाकयुद्ध व वाद पोलीस ठाण्यात देखील गेलाय. पण दोघेही पेटलेले असतांना इतरही नेते आपापले राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आता सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देऊन मतदारांवरील पकड मजबूत करतांना दिसताहेत.

यंदाचा गणेशोत्सव राजकारण्यांसाठी पर्वणी ठरलाय. अगामी निववडणुकीच्या तयारीसाठी म्हणा की, मतदारांवरील पकड मजबूत करण्यासाठी
सर्व राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांनी गणेश मंडळांच्या मदतीने जोरदार शक्तिप्रदर्शन करत गणेशोत्सव ‘हायजॅक’ केल्याचे चित्र आहे. पक्षाचे चिन्ह, स्वत:सह नेत्यांचे छायाचित्र, फलक चौकाचौकांत झळकत आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या गणेश उत्सवात राजकारण्यांची मोठी धूम आहे. पुढे शिक्षक मतदार संघाची निवडणूक आहे. त्यामुळे
राजकीय पक्षांसह इच्छुक पतसंस्थांचे उमेदवार तयारीला लागले असून आता पासूनच पैशांची उधळपट्टी भेट स्वरूपातून करीत असल्याचे बोलल्या जात आहेत. इच्छुकांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. काहींनी पत्रके वाटली, काहींनी स्वत: केलेल्या कामाचा कार्य अहवाल मतदारांसमोर ठेवला, तर काहींनी गाठीभेटी सुरू केल्या. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस या राजकीय पक्षांनी, तर यंदाचा गणेशोत्सवात राजकीय रंग भरला आहे. स्वत:चे अस्तित्व सिध्द करण्यासाठी आपल्या मर्जीतल्या गणेश मंडळांना हाताशी धरून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे.

▪️गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक की राजकीय?

गणेशोत्सव म्हटला की डोळ्यांसमोर उभा राहतो तो भक्तिभाव, मंगलमय वातावरण, “गणपती बाप्पा मोरया”चा जयघोष आणि माणसामाणसांना जोडणारा आनंदोत्सव.
मात्र आजचा गणेशोत्सव खरोखरच धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सव राहिला आहे का? की तो हळूहळू राजकीय शक्तिप्रदर्शन, आर्थिक उधळपट्टी, स्पर्धा आणि दिखाऊपणाचा मंच बनत चालला आहे?

▪️मतदार संपर्क : आगामी निवडणुका आणि राजकीय वर्चस्व टिकवण्यासाठी सर्वच पक्षांचे नेते सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देत आहेत.

▪️मंडळांवर पकड: आर्थिक मदत आणि वर्गणीच्या माध्यमातून राजकीय पक्ष गणेश मंडळांवर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करतांना दिसून येतात.

▪️नेत्यांची प्रतिष्ठा: नामांकित आणि मानाच्या गणपतींच्या दर्शनासाठी बडे नेते हजेरी लावून आपली ताकद व जनआधार प्रदर्शित करीत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!