बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बैल आभाळाची कृपा, बैल धरतीचा जप। काळ्या मातीची पुण्याई, बैल फळलेले तप।। बैल घामाची प्रतिमा, बैल श्रमाचे प्रतीक। बैल माझ्या शिवारात, काढी हिरवे स्वस्तिक।।
ज्येष्ठ वऱ्हाडी कवी विठ्ठल वाघ यांचा ‘वृषभसूक्त’ नावाचा कवितासंग्रह… विलक्षण अशा ‘भूदेव’ शब्दांत त्यांनी बैलाचे वर्णन केले. अशा बैलाच्या श्रमावरच आपली संस्कृती उभी आहे. या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वर्षातला एक दिवस त्याच्यासाठी राखून ठेवलेला सण म्हणजे ‘पोळा!’ हा सण आज शेती मातीशी नाळ जुळलेल्या शिवसेनेच्या राज्यप्रवक्त्या जयश्रीताई शेळके व अभिता ॲग्रो कंपनीचे सीईओ सुनील शेळके या दांपत्याने ‘सर्जा-राजा’ ची विधिवत पूजा करून साजरा केला.
‘आज पुंजा रे बैलाले फेडा उपकाराचं देनं
बैला, खरा तुझा सण शेतकर्या तुझं रीन’ ही
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची काव्यओळ पोळा सणाचा अर्थ अधोरेखीत करते. पोळा हा सण शेतकरी मोठ्या धुमधडाक्यात साजरा करतात.परंतु कोरड्या दुष्काळामुळे यंदाचा बैल पोळा सण अतिशय साधेपणाने साजरा केला आहे. गेल्या 40 दिवसांपासून पावसाने गडी मारल्यामुळे शेतातील पिके करपली आहे.जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी या मागणीसाठी, आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने जिल्हा कचेरीवर धडक देऊन विविध मागण्या मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या आहे.शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा शासन दरबारी डेटा लावल्यानंतर शेळके दाम्पत्यांनी पूजनाने बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.












Total Users : 3429254