spot_img
spot_img

बैलपोळा,पण जरा हटके! मेहकरात लक्षवेधी टॅक्ट्ररपोळा! केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधवांनी केले टॅक्ट्ररचे सारथ्य!

मेहकर (हॅलो बुलढाणा) शेतीमध्ये आधुनिकीकरण वाढल्याने पारंपारिक बैलांचा वापर हळूहळू कमी होत आहे. शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीसाठी बैलांच्या जागी ट्रॅक्टरचा वापर सुरू केला आहे. ट्रॅक्टरने शेतीची कामे होत असल्याने बैलांप्रमाणे ट्रॅक्टरचा पोळा भरविण्याची संकल्पना पुढे आली आणि मेहकर येथे पोळ्यानिमित्त ट्रॅक्टर पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. ट्रॅक्टरचे सारथी होऊन केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव झाले ट्रॅक्टर पोळ्यात सहभागी होते.

सर्वत्र बळीराजाचा सर्वात महत्त्वाचा सण बैलपोळा साजरा होत आहे.आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणत शेती उपयोगी कामे केली जातात.आजच्या शेतीमध्ये बैलांची आणि ट्रॅक्टर यांची उपयोगिता सारखीच असल्याने बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे पोळ्यानिमित्त ट्रॅक्टर पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या ट्रॅक्टर पोळ्या मध्ये केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव ट्रॅक्टर चालवत या पोळ्यात सहभागी झाले होते.शेतकऱ्यांसोबत रात्रंदिवस शेतात राबणाऱ्या बैलाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वत्र पोळा हा सण साजरा केला जातो परंतु आजच्या आधुनिक युगामध्ये शेतकऱ्याकडील बैल जोड्यांची संख्या कमी झाली आहे. शेतीच्या कामगिरी आता ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो किंबहुना त्या माध्यमातून शेतीची कामे केले जातात. त्यामुळे पोळ्या सारखे सण उत्सव हे पुढेही कायम राहावे या दृष्टिकोनातून बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे शेतकरी बांधवांच्या वतीने एक आगळा वेगळा पोळा साजरा करत एक आभीनव मिरवणूक मेहकर शहरातील मुख्य मार्गाने काढण्यात आली.या ट्रॅक्टर पोळ्यामध्ये जवळपास 150 ते 200 ट्रॅक्टर सहभागी झाले होते.जे वर्षभर आपल्या बळीराजा करिता शेतात सर्जा राजाच्या बरोबरीने आजच्या आधुनिक युगात योगदान देत असतात असे ट्रॅक्टर देखील आज आपल्याला शहरातील रस्त्यावर दिसुन आले.या ट्रॅक्टर पोळ्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव माजी आमदार संजय रायमुलकर युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव यांच्यासह शेकडो शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन या ट्रॅक्टर पोळ्याच्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!